अमेरिका आणि चीन यांच्यातील जागतिक वर्चस्वासाठीची लढाईचा तळ आता पृथ्वीवरून चंद्र आणि मंगळ ग्रहांकडे सरकला आहे. दोन्ही देशांनी पृथ्वीच्या बाहेरील वातावरणातील अंतराळात आर्थिक विस्ताराची घोषणा केली असून त्यामुळे जगाला अनिश्चिततेत ढकलले आहे. अमेरिका किंवा चीन यांच्यापेक्षा अगदी थोड्या प्रमाणात असले तरीही, भारत हाही मंगळ ग्रहावरील वातावरणाचा शोध घेत आहे. गेल्या एप्रिलमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी जारी केलेले कार्यकारी आदेश आणि चिनी अंतराळ महत्वाकांक्षा यावरून भारताला आपला अंतराळ कार्यक्रम मजबूत करण्याची गरज आहे, हे स्पष्ट झाले आहे.
अमेरिकेने असा इशारा दिला आहे की, चांद्र स्त्रोतांवर दावा करणाऱ्या कोणत्याही देशाला अमेरिका विरोध करेल. अंतराळातील व्यावसायिक खनिकर्माला कोणत्याही राष्ट्राने कशाला विरोध करायचा? याचे उत्तर 1979 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदेचा भाग म्हणून स्वाक्षरी करण्यात आलेल्या चांद्र करारात आहे. भारत, पाकिस्तान आणि फ्रान्ससह 18 देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
अमेरिका, चीन, रशिया आणि युनायटेड किंग्डम यांनी या करारावर शिक्कामोर्तब केले नव्हते. भारताने अधिकृतरित्या या करारावर स्वाक्षरी केली असली तरीही,भारताने त्याच्या उद्दिष्टांना मंजुरी दिलेली नाही. गेल्या काही काळापासून, भारताला या करारातून माघार घेण्यास सांगण्यात आले आहे. चांद्र करार हा देशांच्या चंद्रावरील आणि इतर खगोलीय हालचालींचे प्रशासन करतो. या संस्थांचा उपयोग केवळ शांततापूर्ण उद्दिष्टांसाठी झाला पाहिजे. या उद्दिष्टांचे पालन करताना, चंद्रावर खनिकर्म करून जे काही स्त्रोत मिळतील, ते सर्व मानवजातीमध्ये वाटले गेले पाहिजेत. ज्या देशांनी करारावर स्वाक्षरी केली नाही, त्यांनी हे बंधन पाळण्याची गरज नाही. म्हणूनच अमेरिकन प्रशासनाने अंतराळातील खाणकाम करून सापडलेल्या स्त्रोतांच्या उपयोगाच्या बाबतीत असलेली अनिश्चितता संपवली पाहिजे, असे विधान केले आहे.
या आदेशामध्ये अमेरिका पृथ्वीबाहेरील वातावरणाकडे अमेरिका जागतिक सामायिक क्षेत्र म्हणून पहात नाही. यावर जोर दिला आहे. ट्रम्प यांनी 1979 च्या कराराला अपयशी ठरलेला प्रयत्न असे म्हटले आहे. यापुढे, अमेरिकन सरकारला चीन या करारारा अनावश्यक फायदा घेऊन अडथळे निर्माण करेल, असा संशय वाटत आहे.
चिन आपल्या स्वतःच्या अंतराळ कार्यक्रमासह झपाट्याने पुढे जात आहे. अलिकडेच, त्याने लाँग मार्च 5 बी या पहिल्या उड्डाणाद्वारे द्वारे कार्गो रिएंट्री व्हेईकल हे हवा भरण्यायोग्य यान अवकाशात सोडले आहे. यापूर्वी, चिनने चंद्रावर आधारित विशेष आर्थिक विभाग स्थापित करण्याचा प्रस्ताव दिला होता, ज्याचा उद्देष्य 10 ट्रिलियन अमेरिकन डॉलर अंतराळ सेवा, औद्योगिक उत्पादन आणि व्यावसायिक अंतराळ खनिकर्माच्या माध्यमातून आपल्या अर्थव्यवस्थेत आणण्याचा होता. चिनच्या अतिमहत्वाकांक्षी अंतराळ मोहिमांचा मुकाबला करण्यासाठी, अमेरिकेने चंद्रावर दिर्घकालीन मुदतीची शाश्वत उपस्थिती स्थापीत करण्याच्या उद्देष्यासह आर्टेमिक कार्यक्रम सुरू केला.
या संदर्भात, अनेक तज्ञ भारताला 1979 च्या करारातून बाहेर पडण्याचा आग्रहपूर्वक सल्ला देत असून आर्टेमिक कार्यक्रमात सहभागी होण्यास सुचवत आहेत. या शक्यतेचा भारत सरकार संपूर्णपणे विचार करणार आहे. भारताने मंगळयान, चांद्रयान आणि गंगायान यासह अनेक अंतराळ मोहिमा यशस्वीपणे सुरू केल्या आहेत, हे नमूद करण्याजोगे आहे. चीनच्या अंतराळ वर्चस्वाविरोधात उभे राहण्यासाठी भारताला अमेरिकेच्या आधाराची गरज आहे.