देशातील अनेक धरणांना 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असून अशा जुन्या धरणांचा लक्षावधी नागरिकांच्या जीवितास धोका असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात म्हटले आहे. 'जुनी होत असलेली धरणे : एक जागतिक संकट' असे या अहवालाचे शीर्षक आहे. या अहवालानुसार 2050 पर्यंत जगभरातील लाखो नागरिक हे 20 व्या शतकात उभारलेल्या धरणांच्या खाली म्हणजेच प्रवाह क्षेत्रात राहत असतील. यापैकी अनेक धरणांचे त्यांच्या संरचनात्मक आयुष्य तोपर्यंत संपलेले असेल.
मुल्लापेरियार धरणाची केस स्टडी
तामिळनाडूतील मुल्लापेरियार धरणाचा या अहवालातील केस स्टडीत समावेश होता. केरळमधील पेरियार नदीवरील मुल्लापेरियार धरण 125 वर्षे जुने असून हे धरण फुटले तर केरळातील 35 लाख लोकांना याचा फटका बसेल असे यात म्हटले आहे.
- मुल्लापेरियार धरणाची उंची 53.6 मीटर इतकी आहे.
- तर धरणाची क्षमता 44.3 कोटी क्युबिक मीटर इतकी आहे.
- हे धरण केरळमधील पेरियार नदीवर असून तामिळनाडूत धरणाचे पाटक्षेत्र आहे.
- बांधकामाच्या वेळेस धरणाचे आयुष्य 50 वर्षे इतके निर्धारित होते. मात्र बांधकामाच्या शंभर वर्षांनंतरही धरण सेवेत आहे.
- सध्या धरणाला काही ठिकाणी तडे गेल्याचे दिसत असून यामुळे धोका संभवतो असे यात म्हटले आहे.
- 2009 मध्ये केरळ सरकारने नवे धरण बांधण्याची विनंती केली होती. मात्र तामिळनाडूने याला विरोध दर्शविला.
- जुन्या होत असलेल्या मुल्लापेरियार धरणाच्या व्यवस्थापनाचा मुद्दा सध्या दोन्ही राज्यांत चर्चिला जात आहे.
- जर हे धरण फुटले तर किमान 35 लाख लोकांना याचा फटका बसू शकतो.
लोकसभेत धरण सुरक्षा विधेयक मंजूर
धरणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आला. या अनुषंगाने ऑगस्ट 2019 मध्ये लोकसभेत धरण सुरक्षा विधेयक पारित करण्यात आले. धरणांची निगराणी, पाहणी, संचालन आणि देखभालीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारणीची शिफारस विधेयकात करण्यात आली आहे. 15 मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या किंवा 10 ते 15 मीटरदरम्यान उंची असलेल्या देशातील सर्व धरणांना विधेयकातील तरतुदी लागू असतील. दोन राज्यांमध्ये असलेल्या धरणांसंबंधीचे मुद्दे सोडविण्याची शिफारसही यात आहे. देशातील सुमारे 92 टक्के धरणे दोन राज्यांमधील नदीखोऱ्यात आहेत.
20 व्या शतकात धरणांचे बांधकाम वाढले