महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

चांगल्या उपचारांनी कोविड १९चे गंभीर रुग्ण देखील होतात बरे : सर्व्हे - कोरोना उपचार

कोविड १९मुळे श्वसनाची गंभीर समस्या निर्माण झालेल्या रुग्णांवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उच्च दर्जाचे उपचार केल्यास गंभीर रुग्ण देखील बरे होऊ शकतात असे मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल आणि बेथ इस्त्राईल डिकॉनेस मेडिकल सेंटरच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Study reveals most critical COVID-19 patients survive with standard treatment
चांगल्या उपचारांनी कोविड १९चे गंभीर रुग्ण देखील होतात बरे : सर्व्हे

By

Published : May 10, 2020, 8:34 PM IST

मॅसॅच्युसेट्स (यूएसए) -जग कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देत असताना, बोस्टनमधील दोन रुग्णालयांतील तज्ज्ञांनी दिलासा देत कोविड १९मुळे गंभीर आणि अत्यवस्थ असल्यामुळे अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण देखील मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उच्च दर्जाचे उपचार केल्यास पूर्णपणे बरे होऊ शकतात असे म्हटले आहे.

मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटल (MGH) आणि बेथ इस्त्राईल डिकॉनेस मेडिकल सेंटरच्या क्लिनिशयन्सनी व्हेंटिलेटरची आवश्यकता असलेल्या कोविड १९च्या रुग्णांची चर्चा केली. अमेरिकन जर्नल ऑफ रेस्पिरेटरी आणि क्रिटिकल केअर मेडिसिनमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर जगभरातील रुग्णालये आजारी रुग्णांचे अनुभव सार्वजनिक करत आहेत. मात्र उपचारादरम्यान प्रभावी ठरलेली उपचारपद्धती सांगितली जाईलच असे नाही त्यामुळे अनेकांचे नुकसान होऊ शकते.

ही बाब लक्षात घेऊन अधिक विश्वासार्ह माहिती प्रदान करण्यासाठी MGH चे एमडी, पीएचडी आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलचे असिस्टंट प्रोफेसर सी. कोरी हार्डीन यांच्या नेतृत्वाखालील एक टीम या रुग्णांच्या नोंदी काळजीपूर्वक तपासात आहेत. यामध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या ६६ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे.

हा अभ्यास करत असताना कोविड १९च्या रुग्णांमध्ये फुफ्फुसांची यंत्रणा धोक्यात आणणारा 'अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS)' नावाचा जीवघेणा आजार होत असल्याचे आढळून आले आहे.

मागील ५० वर्षांपासून आपण ARDSवर प्रभावी उपचार पद्धती शोधून काढल्या असल्याचे सांगत भीतीचे कारण नसल्याचे हार्डीन यांनी म्हटले आहे.

तसेच ARDSमध्ये वापरण्यात येणारी पोटावर झोपण्याची 'प्रोन व्हेंटिलेशन' ही उपचारपद्धती कोविड १९च्या रुग्णांवर देखील तपासली जात असून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाचे म्हणजे रुग्णालयांनी नोंद केल्यानुसार मृत्यूचा दर जास्त असलेल्या १६.७ टक्के रुग्णांवर ही उपचार पद्धती वापरण्यात आली. तसेच सरासरी ३४ दिवसांच्या उपचारानंतर ७५.८ टक्के गंभीर असलेल्या आणि व्हेंटीलेटरची मदत घेणाऱ्या रुग्णांना घरी सोडण्यात आले.

त्यामुळे श्वसनाच्या समस्येचा सामना करणाऱ्या कोविड १९च्या रुग्णांवर उपचार करताना पुराव्या आधारे यशस्वी ठरलेले उपचारच मार्गदर्शक सूचनांचे पालन करून द्यावेत. इतर कोणतेही निदान करण्यापूर्वी त्याच्या यशस्वितेची पुराव्या आधारे खात्री झाली असेल तरच ती वापरावी असे 'मास जनरल' येथील मेडिसिनचे प्रमुख आणि सह लेखक जेहान अल्लादीना यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :कोरोना चाचणीसाठी इंग्लंडने अमेरिकेला पाठवले ५० हजार नमुने...

ABOUT THE AUTHOR

...view details