सिंगापूर : सध्या संपूर्ण जग महाभयंकर कोरोना विषाणूशी लढत आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी सिंगहेल्थ ड्यूक-एनयूएस ॲकॅडेमिक मेडिकल सेंटर (एएमसी) च्या शास्त्रज्ञांनी मानवी रोगप्रतिकारक प्रणाली बनवणाऱ्या इम्युनोम अर्थातच जीन्स आणि प्रथिनांचा वेब आधारित ॲटलस विकसित केला आहे.
या ॲटलसला ईपीआयसी (EPIC) - इक्सटेंडेड पॉलीडायमेन्शनल इम्युनोम कॅरेक्टरायजेशन देखील म्हटले जाते. ज्यामध्ये होस्ट जीव नवजात अवस्थेपासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत आपल्या रोगप्रतिकारक पेशींचा डेटाबेस वाढवत असतो. म्हणुन जगभरातील वैज्ञानिक समुदायाद्वारे या डेटाबेसचा वापर रोगप्रतिकार प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी केला जाऊ शकतो.
ईपीआयसी रोगप्रतिकारक रचनेची ठोस माहिती पुरवण्यासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरुन या डेटा सेटच्या विश्लेषणाची सुविधाही पुरवते. परिणामी कोरोना विषाणूसंदर्भात अभ्यासाची गती वाढवण्यास किंवा सखोलता आणण्यात ईपीआयसी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. तसेच यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांना ही माहिती मुक्तपणे उपलब्ध होऊ शकते.
सिंगहेल्थ ड्यूक-एनयूएस ट्रान्सलेशनल इम्युनोलॉजी इन्स्टीट्युटचे संचालक आणि या अभ्यासाचे मुख्य संशोधक प्रोफेसर साल्वाटोर अल्बानी म्हणाले की, “मानवी इम्युनोमचा अभ्यास म्हणजे पेशीच्या स्तरावर मानवी शरीराचा एमआरआय करण्यासारखे आहे. हा अभ्यास, योग्य किंवा चुकीचे काय आहे ? तसेच या रोगाचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? याबद्दल आम्हाला सक्षम करेल. तसेच आम्हाला आशा आहे की, ईपीआयसी मानवी इम्युनोमचा वापर व्यापक डेटासेट किंवा विश्लेषणाचा घटक म्हणून कार्य करेल. जी चिकित्सकांना आणि शास्त्रज्ञांना रोग प्रतिकारशक्तीची कार्यपद्धती समजून घेण्यास मदत करेल. तसेच अचूक औषध निर्मितीसाठी वैद्यकीय अंदाज लावता येईल आणि नवीन लस किंवा थेरपी शोधून काढण्यात देखील एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल.”
“कोणतीही लस विकसित करत असताना शास्त्रज्ञ नेहमी रोगप्रतिकार संकेतांकडे लक्ष देत असतात. ज्यामुळे विशिष्ट लसला मानवी शरीर कसा प्रतिसाद देऊ शकेल, याचा अंदाज लावता येतो. ईपीआयसी अशा प्रकारचे संकेत अधिक जलद गतीने ओळखण्यास आणि लस निर्मिती प्रक्रियेस गती देण्यास मदत करू शकते,” असेही प्रा. अल्बानी म्हणाले.