नवी दिल्ली : भारताच्या ईशान्येतील राज्य अरूणाचल प्रदेशला लागून असलेल्या पूर्व भूतानमधील साकतेंग वन्यजीव अभयारण्यावर दावा सांगण्याच्या चिनच्या विस्तारवादी योजनेमागे थिंपूशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा चिनचा प्रयत्न आहे आणि त्याचवेळेस भारत आणि हिमालयीन देश भूतान यांच्यातील संबंधांची परिक्षा चिनला पहायची आहे, असे तज्ञांचे मत आहे.
मंगळवारी एका बैठकीस संबोधित करताना, चिनी परराष्ट्र प्रवक्ता वँग वेनबिन यांनी सांगितले की दक्षिण आशियातील लहान राष्ट्राशी सीमेवरून सुरू असलेला तंटा सोडवण्यासाठी चिनने पॅकेज देऊ केले आहे. चिनची भूमिका सातत्यपूर्ण आणि स्पष्ट आहे. चिन आणि भूतान यांच्यातील सीमा अद्याप आखली जायची आहे आणि सीमेवरील मध्य, पूर्व आणि पश्चिमेतील भाग वादग्रस्त आहेत, असे वँग यांनी म्हटल्याचा हवाला दिला आहे. या सीमावर्ती तंट्यांवर तोडगा शोधण्यासाठी चिनने पॅकेज प्रस्तावित केले आहे. बहुपक्षीय मंचांवर अशा वादांचा मुद्दा बनवण्यास चिनचा विरोध आहे आणि या मुद्यासंदर्भात चिन संबंधित पक्षांशी संपर्कात आहे, असे वँग यांनी म्हटले आहे.
जागतिक पर्यावरण सुविधा(जीईएफ) हा आंतरराष्ट्रीय संस्था, सिव्हिल सोसायटी संघटना आणि खासगी क्षेत्र यांच्या भागीदारीत १८३ देशांना एकत्र आणून जागतिक पर्यावरणाचे मुद्दे सोडवतानाच राष्ट्रीय शाश्वत विकास पुढाकारांना समर्थन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेला निधी आहे. या निधीतर्फे विकसित केल्या जाणार्या साकतेंग वन्यजीव अभयारण्यास चिनने आक्षेप घेतला आहे. त्यानंतर वँग यांचा हा प्रतिसाद आला आहे. जे क्षेत्र चिनच्या आंतरराष्ट्रीय सीमेला लागूनही नाही आणि जे क्षेत्र भारत भूतान सीमेवर आहे, त्या क्षेत्रावर चिन हक्क सांगत असल्याने निरिक्षक अवाक झाले आहेत.
गेल्या महिन्यात झालेल्या लडाख प्रदेशातील रक्तरंजित सीमावर्ती संघर्षानंतर, ज्यात दोन्ही बाजूंच्या सैनिकांची प्राणहानी झाली,भारत आणि चिन हे तणाव कमी करण्यावर चर्चा करत असतानाच चिनची ही नवी खेळी झाली आहे. गेल्या ४५ वर्षांत ३४८८ किलोमीटरच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या परिसरात दोन आशियाई महासत्तांमध्ये प्रथमच संघर्ष झाला. साकतेंग वन्यजीव अभयारण्य हे पूर्व भूतानमध्ये भारताचे राज्य अरूणाचल प्रदेशाच्या सीमेला लागून आहे आणि चिन त्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचे म्हणत अधिकार सांगत आहे.
भूतान आणि चिन यांच्यात कोणतेही अधिकृत राजनैतिक संबंध नाहित. १९५१ मध्ये तिबेट चिनला जोडला गेल्यावर चिन आणि भूतान हे शेजारी देश बनले. सीमावर्ती तंटा सोडवण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी १९८४ पासून २४ बोलण्य़ांच्या फेर्या पार पाडल्या आहेत. मात्र, भारत आणि भूतान हे यांच्यात अगदी मजबूत राजनैतिक संबंध आहेत कारण नवी दिल्ली थिम्पूच्या विकासात प्रमुख भागीदार आहे. भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदारही आहे.