हैदराबाद : सध्या भारतीय लष्कराचा प्रतिष्ठित विभाग असणाऱ्या काहीशा योद्धांच्या पुर्वजांनी 1765 साली पृथ्वीनारायण यांच्या नेतृत्वाखाली भोवतालच्या पर्वतीय जमातींमध्ये आपले सामर्थ्य सिद्ध करण्यास सुरुवात केली. पृथ्वीनारायण हे युरोपियन शिस्त आणि शस्त्रास्त्रांचे कौतुक करत त्याचा लाभ करुन घेणारे पहिले नेपाळी व्यक्तिमत्व होत.
या योद्ध्यांनी काठमांडू, ललितापतन आणि भाटगांव ताब्यात घेतले; आणि पृथ्वीनारायण यांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी आणि नवजात बालकाच्या वतीने राज्य चालविणाऱ्या भावाच्या नेतृत्वाखाली कुमाऊंपर्यंत आपला विस्तार नेला. त्यानंतर, 1790 साली त्यांनी अलमोरा ताब्यात घेतले आणि रामगंगापर्यंत संपुर्ण देशावर राज्य प्रस्थापित केले.
कुमाऊंनतंर आपला मोर्चा पश्चिमेकडे वळविण्यास सुरुवात करत गुरखांनी गढवालवर आक्रमण केले. मात्र, नेपाळवर चिनी आक्रमणाच्या बातमीने त्यांचा विजय लांबला. परिणामी, स्वतःच्या राष्ट्र संरक्षणात सहाय्य करण्यासाठी या आक्रमक सैन्यदलास गढवालमधून माघार घ्यावी लागली. मात्र, पुन्हा काही वर्षांनी गुरखा आक्रमणाची लाट पश्चिमकडे दाखल झाली. फेब्रुवारी 1803 साली गढवालच्या राजाची तत्कालीन राजधानी श्रीनगरवर हल्ला करण्यात आला. त्यानंतर राजाने दक्षिणकडे माघार घेतली. बाराहाट येथे त्याने निष्फळ प्रयत्न केला, परंतु तिथून त्याला प्रथम डून येथे आणि नंतर सहारनपूर येथे पाठवण्यात आले. येथे आल्यानंतर त्रासलेला राजा प्रद्युम्न शाह याने आपली सर्व संपत्ती आणि सिंहासन गहाण ठेऊन काही लाख रुपयांची उभारणी केली. या निधीच्या सहाय्याने त्याने नव्याने आपले सैन्य उभारले, डून येथे परतला आणि आक्रमण करणाऱ्या समुहावर हल्ला केला. त्यावेळी या समुहाने उमर सिंह थापा यांच्या नेतृत्वाखाली देहरा ताब्यात घेतले होते. मात्र, येथे राजा पराभूत होऊन मृत्यू पावला.
जे.बी. फ्रेजर यांनी आपल्या 'हिमालयन माऊंटेन्स' या पुस्तकात नमूद केले आहे की, गढवाल यांचा शेवटचा राज्यकर्ता प्रद्युम्न शाह याच्यावर येणारे संकट, गुरखा शक्तीचा उदय आणि अखेर ब्रिटीश सैन्याकडून झालेला पराभव इत्यादी घटनांची भविष्यवाणी यमनोत्रीपासून फार लांब अंतरावर नसलेली अरुंद दरी पालीगढ येथील पुजाऱ्यांनी केली होती.
एकीकडे ब्रिटीश सैन्य शिवालिक रांगांच्या दक्षिणकडील कड्यापर्यंत पोहोचले तर याचवेळी गुरखांची फौज त्याच डोगररांगांच्या उत्तरेकडील उतारांवर दाखल आली होती. कर्नल बर्न यांनी सहारनपूरकडे कूच केली तर याचवेळी उमर सिंह थापा यांनी ऑक्टोबर 1803 मध्ये देहरा ताब्यात घेतले.
गुरख्यांची राजवट भयंकर होती. यामुळे अनेक ठिकाणच्या मूळ रहिवाशांना स्थलांतरित होण्याची वेळ आली. गुलामगिरी मोठ्या प्रमाणात वाढली; सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना आजीवन गुलामगिरीची शिक्षा देण्यात येत. अन्याय आणि क्रौर्यावर आधारलेली ही राजवट होती असे म्हटले जाते. महसूलातील थकबाकी फेडण्यासाठी अनेकदा गुन्हेगारांच्या कुटुंबाची विक्री केली जात.
खरोखर गढवालमध्ये गुरख्यांच्या वर्तनास 'गुरखानी' असे नाव पडले होते. याचे कारण म्हणजे, लहरी सैनिक रात्रीच्या वेळी गावातील सर्व दूध पिऊन टाकत आणि पुन्हा सकाळच्या वेळी येऊन दह्याची मागणी करत.
गुरखा युद्ध सुरु होण्याचे त्वरित कारण म्हणजे प्रदेशातील वादग्रस्त विभागातील पोलिस स्थानकाची हानी. याची सुरुवात झाली ती तेथील प्रभारी निरीक्षकाच्या ह्त्येने. त्यांनी अत्यंत पराक्रमी रीतीने संरक्षण केले. मात्र, या संघर्षात त्यांच्या 18 कॉन्स्टेबल्सचा मृत्यू झाला आणि 8 कॉन्स्टेबल जखमी झाले. त्यानंतर काही दिवसांमध्येच दुसऱ्या पोलिस स्टेशनवर हल्ला करण्यात आला. दंडात्मक कारवाईसाठी अनुकूल काळ नसल्याने नेपाळच्या राजास आक्रमक निषेध नोंदविणारे पत्र पाठविण्यात आले. मात्र, यावर राजाने उन्मत्त प्रतिसाद दिला. 1 नोव्हेंबर, 1814 रोजी युद्धाची घोषणा झाली. या कारवायांचा उल्लेख 'विल्यम्स मेमॉईर ऑफ दि डून' या पुस्तकात आढळून येईल. लष्करी बळाच्या बाबतीत गुरखा शत्रूच्या तोडीस तोड होते. नालापानी डोंगरावर घाईघाईने बांधण्यात आलेल्या किल्ल्यातून लढणारे, ज्याला कलिंगा असेही म्हटले जाते, लढणारे मूठभर वीर होते; ज्यांची इतिहासात झालेली नोंद निग्रही आणि शूर अशी आहे.