हैदराबाद : इराणी राजवट आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील संबंध आणखीच बिघडत चालले असतानाच, चाबहार झिहेदान रेल्वे मार्गाच्या बांधकामात भारताच्या सहभागावरून निर्माण झालेले वाद आणि चाबहार बंदर प्रकल्पाबाबत असलेली अनिश्चितता या पार्ष्वभूमीवर, तेहरानबाबत भारत अमेरिकेच्या भूमिकेनुसार चालणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. तेहरानमधील भारताचे राजदूत गद्दाम धर्मेंद्र यांनी तेहरान टाईम्स या इंग्लिश दैनिकाच्या वरिष्ठ पत्रकारांशी साधलेल्या संवादात हे विधान केले आहे.
१५ जुलै रोजी घेण्यात आलेल्या या बैठकीची व्हिडिओ चित्रफित समोर आली असून त्यात धर्मेद्र यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की भारत हा एकमेव देश असा आहे की जो आंतरराष्ट्रीय निर्बंध असतानाही स्थानिक इराणी चलनात सुलभ व्यापार करत आहे. सध्याच्या घडीला, भारत बहुतेक चहा, तांदूळ अशा कृषि क्षेत्रातील वस्तु आणि काही कार्सचे सुटे भाग यांची इराणला निर्यात करत आहे. परंतु अमेरिकन दबावामुळे त्याची तेल आयात जवळपास शून्यावर आली आहे.
इराणचे सेंट्रल बँक ऑफ इराण आणि युको बँकेसह भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच इराणच्या इतर ६ बँका वस्तुंच्या विनिमयासाठी स्थानिक चलनात व्यापार करण्याची सुविधा प्राप्त करून देत आहेत. तसेच भारताने अमेरिकेला चाबहारमध्ये आम्ही काय करावे ते अमेरिकेने सांगू नये असे ठणकावले आहे, हे महत्वाचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. दबावासंदर्भात, वस्तुस्थिती ही आहे की, जेथे आम्ही देशांशी द्विपक्षीय व्यापार करतो, त्यात आम्ही एकमेव देश असा आहोत की रूपया-रियाल व्यापारी व्यवस्था सुरू ठेवली आहे. चाबहारमध्ये आम्ही काम करत आहोत,चाबहारसाठी आम्ही यंत्रसामुग्रीची खरेदी करत आहोत, तेथे आम्ही चाबहारची तयारी करत आहोत. आम्ही अमेरिकेला स्पष्ट सांगितले आहे की चाबहारमध्ये आम्ही काय करावे, हे ते सांगू शकत नाहीत, असे राजदूत म्हणाले.
हा व्हिडिओ प्रथम तेहरान टाईम्सने ट्विट केला असून त्यानंतर काढून टाकण्यात आला. त्याच व्हिडिओत गद्दाम यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दोन्ही देशांत स्वाक्षऱ्या झालेल्या वार्षिक आधारावर किंवा अंतरिम करारानुसार, चाबहारमध्ये जहाजांच्या वाहतुकीत महत्वपूर्ण वाढ झाली आहे. डिसेंबर २०१८ आणि २०१९ मध्ये अंतरिम करारानुसार, एका वर्षात आम्ही ६,००० टन कंटेनर्स भरून मालाची वाहतूक केली असून दहा लाखांहून अधिक माल, तांदूळ, साखर, गहू यांची इराण आणि अफगाणिस्तान दोघांसाठीही वाहतूक केली आहे. एका वर्षाच्या आत वाहतूक मोठ्या प्रमाणात विकसित झाली आहे,असेही राजदूत म्हणाले. तेहरान बिजिंगसोबत २५ वर्षाचा सर्वसमावेशक सहकार्य करार करण्याच्या जवळ पोहचला असतानाच इंग्लिश दैनिकात भारतीय राजदूताची ही मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. इराणी परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी हा करार पारदर्षक असल्याचे म्हटले आहे.