हैदराबाद : ३ डिसेंबर १९६७ रोजी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊनमधील ग्रूट श्यूर हॉस्पिटलमध्ये ख्रिस्तियन बर्नार्ड यांनी जगात पहिल्यांदा प्रौढ व्यक्तीवर मानवी हृदय प्रत्यारोपण केले असले तरी नॉर्मन शुमवे यांना ह्रदय प्रत्यारोपणाचे जनक म्हणून ओळखले जाते. ६ डिसेंबर १९६७ रोजी अॅड्रियन कांट्रोविझ यांनी पहिल्यांदा जगातील बाल ह्रदय प्रत्यारोपण केले आणि नॉर्मन शुमवे यांनी ६ जानेवारी १९६८ रोजी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठ रुग्णालयात प्रथम प्रौढावरील हृदय प्रत्यारोपण केले.
• अमेरिकन सर्जन नॉर्मन शुमवे यांनी १९५८ मध्ये पहिल्यांदा कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात कुत्र्यावर प्रथम हृदय ट्रान्सप्लांट केले.
ख्रिस्तियन बर्नार्ड यांच्यानंतर लगेचच भारतात के. के. सेन यांनी मानवातील हृदय प्रत्यारोपणाचा प्रयत्न केला. परंतु, त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. यानंतर डॉ. पी वेणुगोपाल यांनी १९९४ मध्ये नवी दिल्ली येथील एम्समध्ये भारतातील पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडली. या यशाच्या पाठोपाठ लगेचच डॉ. केएम चेरियन यांनी भारतातील पहिली बाल व हृदयातील प्रथम फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली.
२००३ मध्ये देशात प्रथम हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर तो क्षण साजरा करण्यासाठी, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ३ ऑगस्ट राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिन म्हणून साजरा करण्याविषयीची घोषणा केली.
• तसेच त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथील अवयव पुनर्प्राप्ती बँकिंग संस्था राष्ट्रास अर्पण केली. त्यांच्या मते, हे दोन्ही निर्णय हृदय प्रत्यारोपण मोहिमेला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतील.
अमेरिका आणि ब्रिटननंतर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणारा जगातील तिसरा देश बनल्याने ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याची प्रतिक्रिया तत्कालीन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली होती.
भारतातील कायदेशीर चौकट..
मानवी अवयवांचे प्रत्यारोपण विधेयकास ७ जुलै १९९४ रोजी राष्ट्रपतींची संमती मिळाली. उपचाराच्या उद्देशाने आणि व्यापारी व्यवहार रोखण्यासाठी मानवी अवयव काढणे, त्यांचे जतन करणे आणि प्रत्यारोपण व्यवस्था प्रदान करण्यासाठी १९९४ मध्ये मानवी अवयवदान प्रत्यारोपण कायदा (THOA) अस्तित्वात आला. आंध्र आणि जम्मू-काश्मीर वगळता इतर सर्व राज्यांनी हा कायदा स्वीकारला आहे. तर आंध्र आणि जम्मू काश्मीरमध्ये स्वतःचे कायदे आहेत.
• इतर देशांप्रमाणेच भारतात देखील, मानवी अवयवदान प्रत्यारोपण अधिनियमांतर्गत मानवी मेंदूच्या स्टेम सेलचा मृत्यू अधिकृत मृत्यू म्हणून मानला जातो यामुळे अवयवदान करण्याच्या संकल्पनेत क्रांती घडली आहे.
भारत सरकारने १९९४ मध्ये THOA कायद्यात दुरुस्ती व सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि परिणामी, मानव अवयव प्रत्यारोपण (दुरुस्ती) कायदा २०११ लागू करण्यात आला.
ब्रेन डेथ सर्टिफिकेशन देणाऱ्या मंडळाची रचना अतिशय सुलभ केली गेली आहे - जिथे जिथे न्यूरोफिझिशियन किंवा न्यूरोसर्जन उपलब्ध नसतात, तिथे अँनेस्थेटिस्ट किंवा इंटेन्सिव्हिस्ट मंडळाच्या सदस्यांची जागा घेऊ शकतात. आत एकच की तो प्रत्यारोपण करणाऱ्या संस्थेचा सदस्य नसावा.
NOTTO चा नॅशनल नेटवर्क विभाग देशातील अवयव व टिश्यूच्या (उतींची) खरेदी व वितरण आणि देशातील अवयव व टिश्यूच्या देणगी व प्रत्यारोपणाच्या समन्वयाकरिता देशातील शिखर संस्था म्हणून कार्य करेल.
हृदय दान करण्याची देशातील स्थिती