हैदराबाद - येथील सीएसआयआरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) चे संचालक डॉ. एस. चंद्रशेखर म्हणाले, “आम्ही कोवीड -१९ वर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध धोरणांसह पुढे जात आहोत. त्याचाच एक भाग म्हणुन आम्ही केवळ विषाणूविरूद्ध प्रभावी लस किंवा औषध तयार करण्याव्यतिरिक्त, विषाणूचा शरीरात होणारा प्रवेशच रोखू शकणारी लस तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) प्रयोगशाळा यावर संशोधन करीत आहे, अशी माहिती आयआयसीटीने दिली. ‘कोवीड-१९ चाचण्या, सद्य आव्हाने आणि योग्य औषधाची प्रगती’ या विषयावर राज्यसभा टीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
रिवर्स इंजिनिअरिंग...
कोवीड -१९ च्या सध्या जगभर पसरलेल्या साथीच्या महाभयंकर प्रादुर्भावाला कारणीभूत असणारा कोरोना विषाणू गेल्या ४ महिन्यांपासून जगभर विनाशकारी प्रलय आणत आहे. इतक्या कमी कालावधीत या प्राणघातक विषाणूचा प्रतिकार करणारे औषधे किंवा लस निर्माण करणे अवघड आहे. तथापि, आयआयसीटीने रिव्हर्स गीअर अभियांत्रिकी पद्धतीद्वारे जागतिक स्तरावर काम करण्यासाठी काही औषधांची निर्मिती करण्याचे धोरण अवलंबले आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादे औषध तयार केले गेले आणि त्याचे पेटंटही झाले असले तरीही आयआयसीटी हे औषध एका वेगळ्या प्रकारे तयार करते. जे मुळात तयार केलेल्या प्रक्रियेपेक्षा सोपे असते. अशाप्रकारे जगभरात कमी किंमतीत औषध उपलब्ध केले जातात. यालाच आपण जेनेरिक औषधे म्हणतो ज्याचे रिव्हर्स गियर इंजिनीअरिंगद्वारेच उत्पादन घेतले जाते. जगात जिथे कुठेही या औषधाचा किंवा लसचा शोध लावला जाईल. त्यानंतर लवकरात लवकर ते औषध भारतात तयार केले जावे. कारण आपल्याकडे देशातील विविध भागात एफडीएने मंजूर केलेले अनेक उत्पादन प्रकल्प आहेत.