ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली तो जिजाऊंचा‘ शिवबा झाला,
ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,
ज्याला स्त्री ‘मैत्रीण म्ह्णून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला,
आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला,
आई, माँ, माय, माई, अम्मा, मदर.. शब्द बदलले भाषा बदलली पण भावना ( motherhood ) प्रेमाचीच. होय खर तर उद्या मदर्स डे म्हणजेच मातृदिन.. असे म्हणतात की उद्या जगभरात हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच आपल्या देशातसुद्धा मदर्स डे साजरा केला. पण हा दिवस साजरा करताना एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की " माँ का कोई दिन नही होता, माँ से ही दिन ( happymothersday) होता है.... असे असले तरी उद्याचा दिवस हा ( mothersday ) खासच आहे
उद्या मदर्स डे-आई प्रति आपल्या असणाऱ्या भावना प्रकट करण्याचा दिवस म्हणजे मदर्स डे दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस आईच्या प्रेमाला आणि आपुलकीला समर्पित असतो. यंदा 8 मे रोजी मातृदिन साजरा करण्यात येणार आहे. आई आपल्या जीवनात वेगवेगळ्या भूमिका बजावत असते. आईच आपल्यावर मनापासून प्रेम करते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. परिस्थिती कशीही असो, आपल्यासाठी ती कशी हाताळायची हे आईला माहीत असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा खास दिवस कधी सुरू झाला आणि हा दिवस का साजरा केला जातो.
म्हणून साजरा केला जातो मातृदिन- मदर्स डेसारखा खास दिवस अॅना जोर्विस नावाच्या अमेरिकन महिलेने सुरू केला होता. त्याला आपल्या आईबद्दल खूप आपुलकी होती. तिची आई तिच्यासाठी प्रेरणास्थान होती. आईच्या मृत्यूनंतर अॅनाने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. आईच्या नावावर जगण्याचा संकल्प केला. कठोर परिश्रम केले आणि आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी अॅनाने मदर्स डे सुरू केला. या दिवसाला युरोपमध्ये मदरिंग संडे देखील म्हणतात.