हैदराबाद -जागतिक ख्यातीप्राप्त अलंगनाल्लूर-जलीकट्टू(रिंगणात सोडलेल्या बैलांना वश करण्याच्या क्रीडाप्रकारापैकी एक)प्रेक्षणीय खेळ मदुराई जिल्ह्यात नेहमीच्या उत्साहात खेळवला गेला. तर आसामच्या मोरीगाव आणि नागाव जिल्ह्यांमध्ये रेड्यांच्या झुंजी आयोजित केल्या गेल्या. जलीकट्टू हा प्रकार बहुतेक दक्षिणेतच, कावेरी त्रिभुज प्रदेश आणि काही पश्चिमेतील भागांत आयोजित केला जातो. वाडी वसाल या नावाच्या प्रवेशद्वारातून बैल रिंगणात प्रवेश करतात. बैलांच्या प्रशिक्षकांना बैलाच्या उंचवट्यावर निर्धारित वेळेपर्यंत(हा वेळ ३० सेकंद इतका असू शकतो) चढून थांबावे लागते किंवा त्याच अवस्थेत ठरवलेले अंतर कापून जावे लागते. जर तो असे करू शकला तर तो बैल माणसाळला असे समजले जाते आणि बैलाच्या प्रशिक्षकाला सर्वात जास्त संख्येने बैलांना वश केल्याबद्दल सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घरगुती वस्तुंपासून ते कारपर्यंत बक्षिसे वितरित करण्यात येतात. परंतु आसामातील रेड्यांच्या झुंजींचा प्रकार यापासून वेगळा असून ज्यात दोन रेडे एकमेकांवर शिंगांनी हल्ले चढवून त्याला जखमी करून किंवा बुकलून मैदानातून बाहेर हुसकावण्याचा प्रयत्न करतात.
जलीकट्टू हा खेळ तमिळ संस्कृतीचा गुणविशेष म्हणून मानला जातो आणि बैलाला घरचा सदस्य असल्यासारखे वाढवले जाते. आसामातील स्थानिकांच्या अनुसार, रेड्यांच्या झुंजी हा एक रिवाज असून यात रेडे बेफाम होणार नाहित, याची सुनिश्चिती केली जाते आणि या काळात रेड्यांना विलक्षण ताकद मिळते, असे मानले जाते. जलीकट्टू हा तमिळ महिना थाई या पिक कापणीच्या हंगामातील उत्सवाचा भाग आहे. अलंगनल्लूरसह मदुराईमधील तीन प्रमुख क्रीडाप्रकार मंदिराच्या आवारात खेळवले जात असले तरीही, हा खेळ धर्मनिरपेक्ष राहिलेला असून चर्चेसही जलीकट्टूचे आयोजन करतात. आसाममध्ये, बिहू महिन्याचा पहिला दिवस म्हणजे माघ बिहू साजरा करण्यासाठी हा रिवाज आयोजित करण्यात येतो.