हैदराबाद - देशाने पाहिलेल्या सर्वाधिक वाईट अशा आरोग्यविषयक आणि आर्थिक आघाडीवरील संकटातून गेल्यावर, भारत हळूहळू गती प्राप्त करत आहे. नवीन कोविड-१९ संसर्गाच्या केसेसमध्ये होत असलेली घट आणि देशभरात लसीकरणाचा सुरू असलेला कार्यक्रम यामुळे राष्ट्राच्या आर्थिक पुनरूज्जीवनाच्या आशा नव्याने पल्लवित झाल्या आहेत. प्रत्यक्षात, आर्थिक विकासाच्या काही निर्देशकांची आकडेवारी हीच गोष्ट सुचवत आहे. उदाहरणार्थ, डिसेंबर २०२० मध्ये उत्पादन क्षेत्रातील क्रियाशीलता मजबुतीकडे जातच राहिली असून उत्पादनसूचीची(इन्व्हेंटरी) नव्याने उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू असताना अनेक व्यवसायांनी आपले उत्पादन वाढवले आहे. उत्पादन क्षेत्रातील हंगामानुसार समोयोजन केला जाणारा पर्चेस मॅनेजर्स इंडेक्स(खरेदी व्यवस्थापक निर्देशांक) हा ५६.४ टक्के होता, जो
नोव्हेंबरच्या ५६.३ टक्क्यांपेक्षा किंचित जास्त आहे. दुसरीकडे, अर्थव्यवस्थेतील मागणीचा प्रमुख निर्देशक म्हणजे प्रवासी वाहनांच्या विक्रीचा निर्देशांकही डिसेंबर २०२० मध्ये, गेल्या वर्षी याच कालावधीतील निर्देशांकाच्या तुलनेत, १४ टक्के इतका वाढला. शेअर बाजारातही तेजीचा कल दिसून आला असून सेन्सेक्सने(शेअर बाजार निर्देशांक) २१ जानेवारी, २०२१ रोजी प्रथमच ५० हजाराचा टप्पा ओलांडला. एप्रिल २०२० मध्ये जेव्हा देशात टाळेबंदी लागू करण्यात आली, तेव्हाच्या स्तराशी तुलना केली असता, ही वाढ जवळपास ७० टक्क्यांची आहे.
याव्यतिरिक्त, भारतीय रिझर्व्ह बँकेनेही आपल्या ताज्या मासिक अधिकृत अहवालात, भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक आशादायक दृष्टिकोन व्यक्त केला असून भारताची अर्थव्यवस्था ही आर्थिक मंदीतून वर येत असल्याचे म्हटले आहे. याला व्ही आकाराची सुधारणा असे म्हटले जाते, त्याकडे भारतीय अर्थव्यवस्था निघाल्याचे म्हटले आहे. वर उल्लेख केलेल्या निर्देशांकांची कामगिरी आणि त्यांना बाजारपेठेने दिलेला प्रतिसाद हा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मोठा दिलासा असून याच अर्थव्यवस्थेने २०२० च्या पहिल्या तिमाहीत २३.९ टक्क्यांनी अधोगतीकडे वाटचाल केली होती. स्वतंत्र भारतातील ही सर्वात नीचांकी कामगिरी आहे. अर्थव्यवस्थेच्या कामगिरीबद्दल या सकारात्मक बातम्या स्वागतार्ह असल्या तरीही, आम्ही विकासाच्या आघाडीवर जी प्रगती सुरू केली आहे, तिला रूळावंरून घसरवणाऱ्या शक्तिं विरोधातील आपला लढा सुरू ठेवण्यापासून धोरणकर्त्यांनी आपले लक्ष हटवू नये. दोन दिवसातच अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करण्यास तयार होत असताना, त्या पार्श्वभूमीवर जी छुपी आव्हाने आहेत, ती समजून घेण्याची आणि प्राधान्याने त्यांचे निराकरण करण्याचीही गरज आहे.
ही आव्हाने अजूनही कायम आहेत -
पहिले आणि सर्वात महत्वाचे आव्हान आहे ते उत्पन्नातील असमानतांचे, जे कोविड-१९ ने देशाला आपल्या कवेत घेतल्यावर अधिक सखोल आणि व्यापक बनले आहे. समाजातील विविध घटकांमध्ये, महामारीचा सामना करताना उत्पन्नावर झालेले परिणाम हे वेगवेगळे असल्यामुळे हे घडले आहे. नोकरदार वर्गाने नोकर्या गमावल्या आणि त्याची बचत रोडावली, तर दुसरा वर्ग असा आहे की याचवेळी त्याची भरभराट झाली. ऑक्सफॅमच्या अहवालातून हे स्पष्टपणे समोर आले आहे. भारतीय अब्जाधिशांचे उत्पन्न गेल्या दहा महिन्यांत व्यापक म्हणजे ३५ टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यात म्हटले आहे. पहिल्या शंभर सर्वोच्च अब्जाधिशांच्या संपत्तीतील वाढ ही दहा वर्षांसाठी मनरेगा योजना शाश्वत राखण्याएवढी आहे, असे या अहवालात सुचवले आहे. दुसरीकडे, कॉर्पोरेटच्या म्हणजे बड्या कंपन्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे त्याच प्रमाणात रोजगाराच्या शक्यता वाढल्याचे दिसत नाहि. अजूनही नव्या नियुक्त्यांनी म्हणावा तसा वेग घेतलेला नाहि आणि अनेक विद्यमान कर्मचारी कमी केलेल्या पगारात काम करत आहेत, यामुळे असे घडले आहे. याचा गंभीर परिणाम मागणीतील एकूण वाढीवर झाला असण्याची शक्यता आहे. आर्थिक वाढ साध्य करणे आणि ती शाश्वत राखण्यासाठी ही गोष्ट अत्यंत घातक आहे.