हैदराबाद : कोविड-१९च्या गंभीर रुग्णांमध्ये ग्रॅन्युलोसाइट-मॅक्रोफेज कॉलनी उत्तेजक घटक (जीएम-सीएसएफ) अँटीबॉडीच्या रोगनिदानविषयक भूमिकेचे मूल्यांकन करताना आय-मॅबने शोधलेल्या टीजेएम २च्या क्लिनिकल चाचणीचे अंतरिम निकाल अभ्यासले गेले. त्यामधून टीजेएम-२ गंभीर आजारी रूग्णांमधील गुंतागुंत सोडवून रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी सक्षम असल्याचे आढळून आले आहे.
या जैवशास्त्रीय घटकाच्या शोध, विकास आणि व्यावसायीकरणासाठी क्लिनिकल-स्टेज बायो फार्मास्युटिकल कंपनी आय-मॅबने झोकून देऊन प्रयत्न केले. यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी असलेल्या क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉलचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासाची वैधता सुनिश्चित करण्यासाठी प्रबळ निष्कर्ष आणि डेटा दर्शविणारी आय-मॅब अँटी जीएम-सीएसएफ अँटीबॉडीच्या जागतिक स्तरावरील अभ्यासकांपैकी पहिली कंपनी आहे.
डेटा देखरेख समितीने (डीएमसी) यासंदर्भातील घोषणा केली. समितीने रुग्णांच्या सुरक्षिततेचा अभ्यास आणि या शोधाचा अभ्यास करण्यासाठी शोधाच्या पहिल्या भागाचा अभ्यास केला. शोधाच्या सखोल पुनरावलोकन आणि विश्लेषणानंतर, आय-मॅब नियोजनाप्रमाणे दुसऱ्या भागाचा अभ्यास सुरू करू शकतो असा डीएमसीने निष्कर्ष काढला. यावरून टीजेएम-२ कोविड-१९ने गंभीर रुग्णांसाठी सुरक्षित आणि सुसह्य असल्याचे सूचित झाले.
"पहिल्या भागासारखाच आराखडा दुसऱ्या भागातील अभ्यासाचा असून त्याच रुग्णांवर उपचार करण्यात येतील. हा अभ्यास लवकरच सुरु करण्यात येईल. कोविड-१९ने त्रस्त असलेल्या १२० रूग्णांना प्लेसेबो किंवा टीजेएम-२च्या ६ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅमचा एक डोस देऊन कार्यक्षमता, सुरक्षा आणि सायटोकिन पातळीचे मूल्यांकन करण्यात येईल," अशी माहिती समितीने दिली.
याव्यतिरिक्त, डीएमसीने समावेश मापदंड वाढविण्यासाठी प्रोटोकॉल बदलांना समर्थन देत सर्व रुग्णांना ६ मिलीग्रॅम प्रती किलोग्रॅमचा टीजेएम-२ किंवा प्लेसेबोच्या डोसला परवानगी दिली.