हैदराबाद - १९९५ च्या पूर्वी, केरळमध्ये हजारो शिक्षक असे होते की जे सकाळी उठायचे ते नोकरी गमावण्याच्या भीतीनेच. बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत राखण्याचे त्यांचे कळकळीचे प्रयत्न दयनीय रित्या अपयशी ठरलेले दिसायचे कारण पालक अधिक आधुनिक, अत्यंत सुव्यवस्थित अशा खासगी शाळांच्या पाठिशी असत, ज्या शाळा त्यांच्या निकटच्या सान्निध्यात भूछत्राप्रमाणे सातत्याने वाढत होत्या. आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये ठेवण्यासाठी, त्यांची भरमसाठ देणगी आणि शाळेचे शुल्क भरण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंब आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत अगदी पिळून काढायचे. सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत तेव्हा तुकड्या कमी करणे आणि शिक्षक कपात हे दररोजचे निकष झाले होते. सरकारी शाळांमध्ये मुलांनी प्रवेश घ्यावा म्हणून त्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षक अक्षरशः मुलांच्या घरांवर धाडी टाकत. सरकारी शाळांमध्ये त्यांचे प्रयत्न विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सुधारू शकले तरीही, सरकारी शाळांमधून खासगी शाळांमध्ये होणारे स्थलांतर काही अथकपणे सुरूच होते. जेव्हा स्थिती फारच निराशाजनक दिसू लागली, तेव्हा केरळच्या सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेने २०१६ पासून बेजोड असे पुनरूज्जीवन होत असल्याचे पाहिले आणि साडेचार वर्षात तर नीती आयोगाच्या राज्य शिक्षणदर्जा निर्देशांक अहवाल २०१९ मध्ये, केरळमधील सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेला देशातील सर्वोत्कृष्ट म्हणून वर्ग बहाल केला आहे.
सरकारने काय केले -
शिक्षण मंत्रि प्रो. सी. रविंद्रनाथ यांच्याकडून २०१६ मध्ये सार्वजनिक शिक्षण पुनरूज्जीवन मिशन नावाची विशेष मोहिम सुरू करण्यात आली. या मिशनमागील गाभ्याची कल्पना सार्वजनिक शिक्षण प्रणालीचे पुनरूज्जीवन करून सर्वासाठी दर्जेदार शिक्षणाची सुनिश्चिती करणे आणि केरळला भेदभावापासून मुक्त करण्याची होती. आणि गेल्या साडेचार वर्षांत याचे परिणाम आश्चर्यकारक आले आहेत. ही मोहिम सुरू केल्यापासून, सरकारने अनेक प्रकल्पांना सुरूवात केली. IT@School हा प्रकल्प, जो २००१-०२ मध्ये सुरू करण्यात आला होता, तो केरळ शिक्षणासाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान(केआयटीई) पुन्हा सुरू करण्यात आला. केआयटीई हा केरळच्या शिक्षण विभागाचा पहिला स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी प्रकल्प असून त्याच्यासमोर प्रचंड अवघड अशी कामगिरी होती. केआयटीईचा प्रमुख उद्देष्य राज्यातील १५,००० हून अधिक सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये आयसीटी समर्थित उपक्रमांची रचना, विकास आणि बाणवण्याचा होता. केआयटीई केरळ पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक निधी मंडळाने निधी पुरवठा केलेला पहिला एसपीव्ही प्रकल्प ठरला.
केआयटीई सार्वजनिक शिक्षण पुनरूज्जीवन मोहिमेला समग्र आशय संकेतस्थळ, संपूर्ण शाळा व्यवस्थापन सॉफ्टवेअर आणि स्कूल विकीसारख्या विशेष पुढाकारांच्या माध्यमातून पुरवठा करते, ज्याद्वारे सहयोगी मजकूर विकसित करण्याच्या प्रक्रियेत १५ हजार शाळा जोडल्या जातात. केआयटीईने देशातील संपूर्ण पहिली शैक्षणिक वाहिनी व्हिक्टर्स सुरू केली असून कोविडमुळे टाळेबंदीच्या काळात जेव्हा शिक्षण प्रणाली ऑनलाईन वर्गांकडे वळली, तेव्हा ही वाहिनी अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली होती. केआयटीईने सुरू केलेला विशेष प्रकल्प लिटल केआयटीई आयटी क्लबने अनिमेशन, सायबर सुरक्षा, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, मल्याळी संगणकीय, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिस्क आदी पाच विविध क्षेत्रांमध्ये एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले. दीड लाखांहून अधिक शिक्षक आणि पंन्नास लाखांहून विद्यार्थ्यांना केआयटीईने सुरू केलेल्या आयसीटी पुढाकारांचा लाभ होतो.
लैंगिक समानतेवर विशेष फोकस
शिक्षण पुनरूज्जीवन मोहिमेचा भाग म्हणून, शालेय विद्यार्थ्यांमध्ये अधिक चांगली स्त्रीपुरूष समानतेची जाणिव निर्माण व्हावी, यासाठी विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आला. जीईटी- यूपी हा मुलींना सक्षम करणारा प्रशिक्षण कार्यक्रम हा उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्देष्याने आहे. या शाळांमध्ये स्पेशल गर्ल्स क्लब स्थापित करण्यात आले, ज्यांचा हेतू शाळेतील उपक्रमांच्या संदर्भात स्त्रीपुरूषांमधील तफावती समजून घेण्यासाठी समूह चर्चा, वादविवाद स्पर्धा आणि इतर उपक्रम आयोजित करण्याचा आहे. लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरणाच्यालकल्पनांवर आधारित वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येते.