महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

कोविड-१९ विषाणूवर जनुक आधारित लस शोधण्याच्या दिशेने प्रगती - Massachusetts General Hospital

सुरक्षित आणि कार्यक्षम जीन हस्तांतरणासाठी एएव्ही हे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान असून एएव्हीकोविडमध्ये आम्ही जे आगळेवेगळे तंत्रज्ञान वापरत आहोत त्यामध्ये सार्स सीओव्ही-२ साठी एकाच इंजेक्शनद्वारे अत्यंत ताकदवान अशी प्रतिकारशक्ति उत्पन्न करण्याची क्षमता आहे.

gene-based COVID
कोविड-१९

By

Published : May 12, 2020, 6:03 PM IST

कोविड-१९ वर पहिल्यांदाच लस तयार करण्याच्या जागतिक स्पर्धेत आता नव्या स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. दोन हार्वर्ड संलग्न रूग्णालयांच्या सहयोगाने एएव्ही कोविड(AAV COVID) प्रायोगिक लस विकसित करण्याच्या दिशेने प्रगती झाल्याची घोषणा हार्वर्ड संलग्न रुग्णालयांनी केली आहे.

जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असतानाच, मसॅच्यूसेट आय अँड इअर आणि मसॅच्युसेट जनरल हॉस्पिटल स्थित हार्वर्ड मेडिकल स्कूल येथील संशोधकांनी AAV कोविड या प्रायोगित लसीची परिक्षा घेतली आहे. लस विकसित करण्याच्या दिशेने प्रगती केली असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

एएव्ही कोविड ही नवी गुणसूत्रांवर आधारित लस असून सार्स सीओव्ही २ विषाणुसाठी, जो कोविड-१९ हा आजार होण्यास कारण आहे, तिची परिक्षा करण्यात आली आहे. हा एक वेगळा, गुणसूत्रांवर आधारित लस तयार करण्याचा प्रयोग असून त्यात अडेनो संलग्न विषाणू या तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. गुणसूत्रांचे हस्तांतरण तंत्रज्ञान असून त्यात अडेनो विषाणुंमध्ये रोगकारक शक्ति नसते, त्यामुळे ते निरूपद्रवी विषाणूवाहक आहेत.

एएव्हीचा वापर सार्स सीओव्ही-२ प्रतिजनांच्या गुणसूत्रांच्या अनुवंशिक मालिका तयार करण्यासाठी केला जातो ज्यामुळे शरिरात कोरोना विषाणुच्या विरोधात प्रतिकारशक्ति विकसित होते, हे नमूद करणे आवश्यक आहे. जनुकीय सिद्धांताच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा व्यापक प्रमाणात उपयोग केला जातो आणि एएव्ही आधारित औषधांचे उत्पादन आणि चिकित्साशास्त्रीय उपयोग करण्यासाठी महत्वपूर्ण अनुभव आणि क्षमता आहे.

या लसीबद्दल मसॅच्युसेट आय अँड इअरमधील ग्राऊसबेक जीन थेरपी सेंटरचे संचालक आणि हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये नेत्ररोगशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक ल्युक एच. व्हँडनबर्ग यांनी सांगितले की, सध्या लस पूर्व चिकित्साशास्त्रीय विकासाच्या अवस्थेत असून या वर्षीच्या उत्तरार्धात चिकित्साशास्त्रीय परिक्षा सुरू करण्याची योजना आहे.

सुरक्षित आणि कार्यक्षम जीन हस्तांतरणासाठी एएव्ही हे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान असून एएव्हीकोविडमध्ये आम्ही जे आगळेवेगळे तंत्रज्ञान वापरत आहोत त्यामध्ये सार्स सीओव्ही-२ साठी एकाच इंजेक्शनद्वारे अत्यंत ताकदवान अशी प्रतिकारशक्ति उत्पन्न करण्याची क्षमता आहे.

व्हेडेनबर्ग आणि त्यांच्या प्रयोगशाळेने वुहानमध्ये साथीचा उद्रेक झाल्यावर जानेवारीच्या मध्यास लस तयार करण्याचे काम सुरू केले. नव्या कोरोना विषाणुची जनुकीय मालिका प्रकाशित केली. संकटाच्या काळात, आम्ही रेणवीय जीवशास्त्राच्या शक्तिला कामाला लावू शकतो आणि काही आठवड्यांच्या आत एका लसीचे प्रारूप विकसित करू शकतो आणि तेच आम्ही केले आहे. आता, आमच्या नव्या संशोधनाची सुरक्षा आणि कार्यक्षमता प्रस्थापित करण्यासाठी चिकित्साशास्त्रीय अभ्यासाची गरज आहे, असे व्हॅडेनबर्ग यांनी पुढे सांगितले.

एएव्ही हे झपाट्याने स्वीकार करत जाणारे तंत्रज्ञान आहे. सार्स सीओव्ही-२चा नवे स्वरूप उदयाला आले तर एएव्हीकोविड लसीच्या अंतर्गत सुधारित जनुकीत संहिता जुन्या संहितेऐवजी बदलली जाऊ शकते आणि काही आठवड्यांच्या आत सुधारित लसीची प्रक्रिया केली जाऊ शकते, असेही संशोधकांनी सांगितले. परिक्षेसाठी असलेली एएव्हीकोविड लस स्नायुंच्या पेशीजालात इंजेक्शनमधून घुसवली जाऊ शकते. सध्याच्या घडीला, प्राण्यांवर प्रयोग सुरू आहेत आणि सुरूवातीच्या उत्पादनाचा उपक्रम सुरूही झाला आहे.

पूर्वचिकित्साशास्त्रीय निष्कर्षांवर आधारित, मानवांमध्ये चिकित्साशास्त्रीय चाचणीच्या टप्प्यात एकापेक्षा अधिक लसींचा वापर होऊ शकतो. यावर आणखी पुढे बोलताना, मिलर यांनी आणखी पुढे सांगितले की, व्हँडरबर्ग आणि त्यांच्या पथकाची वैज्ञानिक अंतर्दृष्टी, संस्थांची सहयोगाच्या भावनेतून तसेच तत्काळ लस विकसित करण्याच्या वचनाने एकत्र आलेले दाते या सर्वांचा संयोग म्हणजे हे संशोधन आहे. मास जनरल आणि मास जनरल ब्रिघम इनोव्हेशन फंड यांच्या तज्ञांचा सल्ला या पथकाला मिळत असून लस विकसित करण्याच्या, नियामक व्यवहार आणि उत्पादन क्षेत्रातील तज्ञांचाही सहभाग त्यात आहे. या संशोधनाला विक ग्राऊसबेक, एमिलिया फझ्झलारी आणि इतरांनी परोपकाराच्या भावनेतून निधीचा पुरवठा केला आहे, याचा उल्लेख करणे समर्पक राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details