हैदराबाद - गिलियड सायन्सेसच्या तपासणी पथकाच्या नेतृत्वात घेतल्या गेलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये ज्या रुग्णांना ऑक्सिजनची अतिरिक्त आवश्यकता आहे मात्र ते पूर्णपणे व्हेंटिलेटरवर अवलंबून नाहीत अशा कोविड-१९ रूग्णांना या औषधाचा फायदा होतो असे अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने (एनआयएच) शुक्रवारी म्हटले.
सखोल पुनरावलोकन केलेला डेटा न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. तपासणी करण्यात आलेल्या, अमेरिकन 'फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन'कडून तातडीच्या स्वरूपात परवानगी मिळालेल्या रेमडिसिव्हिर औषधाने कोविड-१९ रूग्णांच्या बरे होण्याचा कालावधी ४ दिवसांनी कमी झाला आहे. त्यामुळे या रुग्नांना ११ दिवसात घरी जाता आले. जे प्लेसेबो या औषधाच्या उपचाराने १५ दिवस लागतात.
रुग्णांच्या रिकव्हरीचा अभ्यास करताना सर्वसाधारण आठ-टप्प्यांमध्ये त्याचे वर्गीकरण करण्यात आले होते. यामध्ये संपूर्ण बरे झालेले रुग्ण ते मृत्यू झालेले रुग्ण अशी वर्गवारी करण्यात आली होती. पंधराव्या दिवशी, प्लेसेबोने उपचार केलेल्या आणि रेमडिसिव्हिरची उपचार पद्धती अवलंबलेल्या रुग्णांची तुलना करण्यात आली असता रेमडिसिव्हिरचा उपचार घेतलेल्या रुग्णाचे आरोग्य चांगले आढळून आले.