हैदराबाद : 'सायटोकिन स्टॉर्म'वरील प्रभावी औषध बनविण्यासाठी लक्ष केंद्रित केलेल्या 'ह्यूमनगेन' या औषधनिर्माण कंपनीने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कोविड १९च्या तिसऱ्या फेजमधील अभ्यासासाठी रुग्णाला 'लेन्झिल्यूमब' डोस देण्यात आला असल्याचे जाहीर केले आहे. विषाणूची लागण झाल्यानंतर जेंव्हा शरीरातील पेशी आपल्याच पेशींवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात, त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी आवश्यक मॅक्रोफेज उत्तेजक घटक (GM-CSF) असलेले कृत्रिम अँटीबॉडी 'लेन्झील्युमब'ची कंपनी निर्मिती करते.
“आम्ही अमेरिकेतील काही प्रमुख संशोधन केंद्रे, रुग्णालयातील तज्ज्ञ आणि आमची कंत्राटी संशोधन संस्था सीटीआय यांच्या बरोबर मिळून उच्च दर्जाच्या लेन्झील्युमबच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत. जेणेकरून दवाखान्यात भरती झालेल्या आणि कोविडची सर्वात जास्त जोखीम असलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांना यापासून वाचविता येईल. या प्रक्रियेत असलेल्या अनुभवामुळे आम्हाला उत्तेजन मिळत असून आम्ही भागधारकांसोबत काम करण्यास आणि माहिती देण्यास उत्सुक आहोत," असे ह्यूमनगेनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कॅमेरून डुरंट यांनी म्हटले आहे.
ज्या वेगाने एफडीएची मंजूरी मिळून कामाला सुरुवात झाली आहे त्याबद्दल सीटीआयचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टिम श्रोएडर यांनी आनंद झाला असल्याचे म्हटले.