१. देश लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याच्या अवस्थेत आहे. या टप्प्यावर, आम्ही कोविड-१९ चा प्रसार टाळू शकतो का? लोकांना आपापले आर्थिक व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देऊनही संसर्ग होऊ नये, म्हणून काय परिणामकारक उपाय असतील?
जेकब - याकडे आम्ही दोन मार्गांनी पाहिले पाहिजे. एक म्हणजे, लॉकडाऊनच्या काळातही(मार्च २५ ते एप्रिल १४) साथ अत्यंत झपाट्याने पसरली. २० दिवसात, २० पटींनी वाढ झाली. लॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्था अत्यंत वाईट अवस्थेकडे चालली होती, हे आम्हाला माहित होते परंतु अपेक्षेप्रमाणे साथीचा वेग कमी होतच नव्हता.
साथीचा वेग कमी करण्यासाठी राष्ट्रीय धोरणात सुधारणा करण्यासाठी ती वेळ होती. लॉकडाऊनपेक्षा साथीचा वेग कमी करण्यासाठी प्रत्येकाने तोंडावर मास्क बांधणे हाच अधिक चांगला मार्ग आहे, हे तोपर्यत आपल्याला कळले होते. जर तसे घोषित करून आणि त्याबाबत लोकांना शिक्षित करून तसेच देखरेख केली असती तर, प्रत्येक जिल्हाधिकार्याने त्याचे पालन करण्याची सुनिश्चिती केली असती, पोलिसांनी रस्त्यांवर कडक नजर ठेवली असती तर अर्थव्यवस्थेचे अधिक नुकसान न करता आम्ही अधिक चांगले परिणाम प्राप्त करू शकलो असतो.
जर प्रत्येकाने मास्क बांधला आणि हात वारंवार स्वच्छ धुण्याचा सराव ठेवला असता तर, शारिरिक अंतर राखण्याचा निकषही आम्हाला ६ ते ८ फुटांवरून २ ते ३ फुटांवर आणता आला असता. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम, परिवहन हे आम्हाला १५ एप्रिलपासून हळूहळू सुरू करता आले असते. एकच खबरदारी आवश्यक घेतली जाणे आवश्यक होते. सर्व वृद्ध आणि ज्यांना जुनाट असंसर्गजन्य आजार आहेत त्यांचे संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी कोषात ठेवणे आवश्यक होते.
लॉकडाऊनचा कालावधी दुसर्या वेळेस वाढवण्यास माझा अत्यंत विरोध आहे आणि तिसर्यांदा तो वाढवल्याने तर मी अतिशय निराश झालो आहे.
२. लोकांना शहर बसेस आणि उपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्याची परवानगी देताना सामाजिक अंतराचे अनेक निर्बंध लागू करण्याची योजना होती. चेन्नईमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर शहर बसेस आणि उपनगरी लोकल्समधून प्रवास करत असल्याचे लक्षात घेऊन सार्वजनिक परिवहनाला परवानगी दिली तर सामाजिक अंतर राखण्याचे निकष पाळणे शक्य होईल का?
जेकब - कडक सामाजिक अंतर राखण्याला साधा आणि कार्यक्षम पर्याय म्हणजे बाजारात विकत मिळत नसेल तर घरी तयार केलेला साध्या कपड्याचा मास्कचा सार्वत्रिक वापर करून सामाजिक अंतर ६ ते ८ फुटांवरून २ ते ३ फुटांवर आणणे हाच आहे. प्रत्येकाला आपले नेहमीचे व्यवहार सुरू करता येतील-लहान मुलांपासून ते सर्व प्रौढांपर्यंत, मुख्यमंत्र्यापासून ते खाली सामान्य माणसापर्यंत, जिल्हाधिकार्यापासून ते शिपायापर्यंत, अधिकार्यांपासून ते हवालदारांपर्यंत-सर्वांनी मास्क बांधायचे. जोपर्यंत साथ संपुष्टात येत नाही तोपर्यंत एकच खबरदारी घ्यावी लागेल, भरगच्च उद्वाहकांमध्ये गर्दी करायची नाही, कुणीही स्पर्ष करण्याइतके जवळ यायचे नाही, कार्यक्रमांमध्ये किंवा बाजार, दुकानांमध्ये गर्दी करायची नाही.मजबूत सरकारांना साधे तोडगे आवडत नाहीत. मला हेच कळत नाही की विषाणुच आम्हाला शिक्षा करत असताना आम्ही स्वतःलाच इतकी शिक्षा का करून घेत आहोत.
३.तापमान आणि कोविड-१९च्या प्रसारात काही नातेसंबंध आहे काय? तामिळनाडू सध्याच्या घडीला उन्हाळ्याच्या परमोच्च बिंदूवर आहे. उष्ण कटिबंधीय हवामान विषाणुचा प्रसार होण्यापासून प्रतिबंधक म्हणून काम करेल का? उच्च तपमानात विषाणुच्या गुणाकारावर परिणाम होतो का?
जेकब - बाह्य तपमान कितीही असले तरीही आमच्या शरिराचे तपमान हे नेहमी ३७ डिग्री असते. विषाणु वाढणार, शिंकेच्या थेंबांच्या मार्गाने बाहेर पसरणार आणि इतरांना श्वासावाटे संसर्ग होणार. दूषित पृष्ठभाग आणि वस्तुंमुळे होणारा संसर्ग ज्याला फोमाईट ट्रान्समिशन म्हटले जाते, ते तपमान उष्ण असले तर कमी होते. अत्यंत उच्च तपमान साथ आटोक्यात आणण्याची अपेक्षा आम्ही करू शकत नाही-पण ते संसर्गाचा वेग कमी करू शकते आणि जेव्हा पाऊस सुरू होईल, वातावरण काहीसे थंड होईल, तेव्हा पुन्हा जुना वेग प्राप्त करेल.
४. नैऋत्य मान्सूनच्या सुरूवातीनंतर कोविड-१९ चा प्रसार झपाट्याने होईल, असे भाकित केले गेले आहे. याचा अर्थ असा आहे की ज्या भागांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊस पडत नाही, त्या भागांमध्ये विषाणुचा प्रसार होणार नाही?
जेकब -आता येणारा मान्सून हा महामारी सुरू झाल्यापासूनचा पहिला आहे. आपण काय घडते ते पाहू या. तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
५. कोविड-१९ मुळे होणाऱ्या मृत्युचा दर, विशेषतः तमिळनाडूत खूप कमी आहे. भारतीयांची प्रतिकारशक्ति युरोपियन आणि अमेरिकनांपेक्षा जास्त आहे का?
जेकब - मृत्युच्या दरावर वृद्ध व्यक्तिंची संख्या आणि ज्यांना जुनाट आजार आहेत परंतु वैद्यकीय उपचारांमुळे जिवंत ठेवण्यात आले आहे, अशांच्या प्रमाणाचा परिणाम होत असतो. हे दोन्ही प्रमाण भारतात अमेरिकेपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे तिकडे जास्त लोक मरण पावणार आणि भारतात कमी, हे नैसर्गिक आहे. खरे तर ३ आठवड्यांच्या लॉकडाऊनचे वचन दिल्यानंतर त्याचा कालावधी वाढवायचे घातक पाऊल उचलायला का नको होते, त्याचे मूळ कारण हेच तर आहे. १५ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाणार नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा आश्वासन दिले होते. सरकारची विश्वासार्हता ढासळली आणि ज्या देशांमध्ये आजीआजोबा आणि वृद्धाश्रम जास्त आहेत, अशा देशांना धोका जास्त असूनही, त्यांच्यापेक्षा कमी तीव्रतेची समस्या असताना, आर्थिक संकट सुरूच राहिले.
६. लसूण, आले, तिखट आणि तत्सम खाद्यपदार्थांचा समावेश असलेल्या भारतीय आहार कोविड-१९ शी लढ्यात सहाय्यकारी ठरेल काय? आहार आणि प्रतिकारशक्ति यांचा काही संबंध आहे काय?
जेकब - त्यासाठी खरोखर कोणताही पुरावा नाही. चांगल्या आहारासोबत चांगले आरोग्य राखणे आणि व्यायाम आमची प्रतिकारशक्ति चांगल्या अवस्थेत ठेवतो. कृत्रिम पद्घती उपयुक्त नाहीत. प्रतिकारशक्ति सुदृढ ठेवण्यासाठी लठ्ठपणा टाळला किंवा नियंत्रणात ठेवला पाहिजे. तसेच मधुमेह आणि इतर जुनाट आजाराची स्थिती नियंत्रणात ठेवलीच पाहिजे. प्रतिकारशक्ति मजबूत ठेवण्याचा तो मार्ग आहे.
७. कोविड-१९ संसर्ग कधी आणि कसा संपुष्टात येईल? काही महिन्यांत आम्हाला लस उपलब्ध होईल काय? हा आजार बरा करण्यासाठी औषध कधी शोधले जाईल?
जेकब - कोविड-१९ रोखण्यासाठी जोपर्यंत लसीचा वापर केला जात नाही तोपर्यंत आम्ही तो संपुष्टात येण्याची अपेक्षा करू शकत नाहि. संसर्ग हा फ्ल्यूसारखे वर्तन करण्याची शक्यता असते-साथीसारखे आणि हंगामी. संसर्गानंतरच प्रतिकारशक्ति विकसित होते. सुदैवाने ८० टक्के संसर्ग हे लक्षणांशिवाय आहेत-संसर्ग ज्याला झाला आहे त्यालाही तो संसर्गग्रस्त आहे हे माहित नाही. त्यामुळेच सर्वांनी ही साथ संपत नाही तोपर्यंत मास्क बांधले पाहिजेत. या महामारीचा शिखराचा कालावधी जुलै आणि ऑगस्ट असेल, अशी आमची अपेक्षा आहे. २०२० च्या अखेरीपर्यंत किंवा २०२१ च्या सुरूवातीपर्यंत साथीचे संक्रमण राहिल. तोपर्यंत औषधे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एचआयव्हीवरील रेमडेसिव्हिर हे औषध आतापर्यंत तरी सर्वोत्कृष्ट आहे. २०२१च्या सुरूवातीपर्यंत एक किंवा अधिक लसी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
- लेखकाविषयी - टी जेकब जॉन, इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सचे माजी अध्यक्ष असून वेल्लोरच्या ख्रिश्चियन मेडिकल कॉलेजमधून निवृत्त झाले आहेत. सध्या ते रोटरी क्लब ऑफ वेल्लोर टीबी कंट्रोल सोसायटीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भारतातील पहिली विषाणुशास्त्रविषयक प्रयोगशाळा स्थापन केली असून संसर्गजन्य आजार आणि चिकित्साशास्त्रीय विषाणुशास्त्र, लसशास्त्र आणि साथीच्या रोगांवर आद्य संशोधन केले आहे. १९७२ मध्ये रक्तसंक्रमणानंतर हेपॅटायटिस बी या रोगाचा धोका शोधून काढला आणि रक्त घेणार्याच्या सुरक्षेसाठी दात्याच्या तपासणीची व्यवस्था स्थापित केली. जिवंत लसीचे ३ डोस देऊनही पोलिओ प्रकरणांमध्ये जगातील लसीच्या पहिल्या अपयशाचे त्यांनी दस्तऐवज तयार केले आणि लसीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अनेक मार्ग दाखवले. यात पल्स व्हॅसिनेशनचा समावेश आहे. वेल्लोर आणि उत्तर अर्कोटमधील त्यांचे पोलिओ निर्मूलनाचे मॉडेल जागतिक पोलिओ निर्मूलनात आघाडीवर राहिले. १९७० आणि ८० च्या दशकात त्यांनी साल्क पोलिओ लसीची अत्यंत कार्यक्षमता दाखवली. रिट्रोव्हायरस प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली आणि १९८६ मध्ये, भारतात पहिल्यांदा वेश्यांमध्ये असलेल्या एचआयव्ही संसर्ग शोधून काढला. सर्व राज्यांमध्ये आयसीएमआर कृतीदलामार्फत एचआयव्हीच्या तपासणीसाठी देखरेख यंत्रणा सुरू करण्यात मार्गदर्शन केले आणि एचआयव्हीसाठी रक्तदात्याच्या रक्ताची तपासणी संस्थात्मक केली.