मागील तीन शतकांतील इतिहासाचा विचार करता नवीन शतकाचा पूर्वार्ध हा मोठी जीवितहानी आणि नाश, साथीचे रोग किंवा महामारी, नैराश्य, आर्थिक आणि सामाजिक संघर्ष इत्यादी घटनांचा साक्षीदार राहिला आहे. दुर्दैवाने, मानव इतिहास विसरत असल्याने किंवा इतिहासाकडून काहीच शिकत नसल्याने या सर्व गोष्टी नवीन असल्याचे वाटते. आपल्यापैकी बहुतेक जण आशावादी आहेत आणि कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या गतीवर दीर्घकालीन परिणाम झाला असल्याचे मान्य करण्यास तयार नाहीत. एवढेच नाहीतर कोविडच्या तडाख्यापासून भारत दूर असल्याचे देखील त्यांना वाटते. कोविडची समस्या अल्प काळासाठी असून पुढील काही महिन्यात आपली अर्थव्यवस्था यावर मात करेल अशी चुकीची धारणा बाळगून भारत स्वतःच्या अर्थव्यवस्थेबाबत चुकीचा गैरसमज करून घेत आहे.
व्यक्तींच्या अस्तित्वावरच परिणाम करणारा कोविड हा आपल्यासमोर येणाऱ्या इतर समस्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. एखाद्या व्यक्तीचे नुकसान एखाद्या घराची कमाई आणि खर्च करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. जेंव्हा मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे संकट जगातील सर्व देशांमध्ये पोचेल आणि कोट्यवधी लोकांवर याचा परिणाम होईल तेंव्हा साहजिकच याचा मोठा परिणाम व्यक्तीच्या घरावर, कंपन्यांवर आणि सरकारांवर होईल.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होईल. जे लोक जिवंत आहेत, त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन आवश्यक वस्तूंवरील खर्च कमी करून आरोग्याच्या काळजीपोटी सावधगिरी बाळगणाऱ्या साधनांवर, औषधांवर खर्च करणे भाग पडेल. मागील 100 वर्षांचा विचार करता, युद्धे किंवा इतर आर्थिक समस्येमुळे अर्थव्यवस्था संकटात येत. मात्र, यावेळी कोविडच्या निमित्ताने पहिल्यांदाच आरोग्याच्या प्रश्नामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
या पार्श्वभूमीवर हे समजणे आवश्यक आहे की, व्यवसाय - उद्योगांसाठी चांगल्या किंवा वाईट घडामोडी घडू शकतात. तशा बातम्या समोर येतील किंवा परिस्थितीनुसार योजना आखल्या जाऊ शकतात. मात्र, खालील तक्त्यात दाखविल्याप्रमाणे जागतिक पातळीवरील अनिश्चितता यापूर्वी कधीही अशी झाली नव्हती (चार्ट पहा). परंतु, यावरून हे स्पष्ट होते की इतर सर्व गोष्टींसाठी योजना आखल्या जात असताना अनिश्चितता ही एकमेव गोष्ट अशी आहे की, ज्याबद्दल योजना आखू शकत नाही. परिणामी उपलब्ध संसाधनांचे जतन करण्याला प्राधान्य देऊन इतर सर्व खर्च थांबविले जातात. अशा प्रकारचे कोट्यवधी व्यवसाय थांबणे म्हणजे व्यवसाय चक्र आणि त्यासह आर्थिक चक्र कोसळण्याची परिस्थिती निर्माण होते आणि रिव्हर्स कॅस्केडींग इफेक्टद्वारे दैनंदिन आर्थिक घडामोडींना मोठी हानी पोहचते.
व्यापार आणि कोविडचा परिणाम
थोडक्यात सांगायचे झाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारावर कोविडने मोठा परिणाम झाला आहे. जागतिक शांततेची स्थिती असताना देखील सुमारे शंभर वर्षात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्या गेल्या. त्याहीपुढे, विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे व्यापाराचे सर्व मार्ग किमान तीन महिन्यांसाठी ठप्प झाले होते. 1980 च्या नंतरच्या जगात पैसा, बाजारपेठ आणि उत्पादने सातत्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाशी जोडली गेलेली असून आंतरराष्ट्रीय सीमा भेदून ती कार्यरत आहेत.
परिणामी कार्यक्षमता वेगाने वाढली असून आणि उत्पादनासाठी लागणारा खर्च सातत्याने घसरत आहे. यातील कोणत्याही एका घटकावर परिणाम झाल्यास या यंत्रणेशी संलग्न असणाऱ्या आणि जगातील कोणत्याही भागात असणाऱ्या गोष्टीवर परिणाम साधतो. त्यामुळे कोविडच्या एकाच फटक्याने जागतिक अर्थव्यवस्था पंगू झाल्या आहेत.
जगातील 90 टक्के व्यापार हा जहाजे किंवा हवाई मालवाहतुकीद्वारे केला जातो. जागतिक व्यापारात आतापर्यंतचा सर्वोच्च 2018 मध्ये नोंदविला गेला. त्यावेळी कच्च्या तेलासह इतर सर्व वस्तूंचे जागतिक व्यापाराचे मूल्य 19.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतके प्रचंड होते. ज्यात विकसित देशांचा वाटा 9.3 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका होता.
तब्बल वीस फूट समकक्ष असलेले महाकाय कंटेनर वापरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर मालाची विक्री केली जाते आणि त्या वस्तूंच्या एकूण व्यापारामधून वर्षाकाठी १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची उलाढाल होते. एका अंदाजानुसार, कोविडमुळे या व्यापारावर साधारणतः 14 ते 30 टक्के इतका परिणाम होईल. फेब्रुवारी ते एप्रिल 2020च्या तुलनेत थोडीशी परिस्थिती सुधारली असली तरी कंटेनर शिप पोर्टनुसार मागील वर्षाच्या तुलनेत (ऑगस्टच्या मध्यपर्यत) सुमारे 7 टक्क्यांची घसरण आहे. कोविड पूर्व कंटेनर रहदारीची परिस्थिती किंवा परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी 2022 पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.