कोरोनाला महामारी घोषित करण्यासाठी जेव्हा जागतिक आरोग्य संघटनेत चर्चा आणि विचारविमर्श सुरु होता, कोरोनाने कसलाही वेळ दवडला नाही आणि जगभरातील देशांना आपले गुलाम बनविण्यास सुरुवात केली होती! जगभरात 16 लाख प्रकरणे आणि 97,000 मृत्यूंसह भयावह परिस्थिती निर्माण करत कोरोनाने भारतातील सार्वजनिक आरोग्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. एकवीस दिवसीय लॉकडाऊन कालावधीचा हा शेवटचा आठवडा आहे. या महिन्यातील 16 तारखेला कोरोनाची देशातील व्याप्ती स्पष्ट होईल.
भारतात पहिल्या 500 प्रकरणांची नोंदणी होण्यासाठी 55 दिवसांचा कालावधी लागला. परंतु, अस्तित्वात असलेल्या ६ हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये एका दिवसात ८००हून अधिक प्रकरणांची भर पडली, यावरुन परिस्थिती धोकादायक होत चालल्याचे दिसते. जेव्हा लक्षणे आढळून येणाऱ्या सर्व रुग्णांची तपासणी पुर्ण होईल, तेव्हाच कोरोनाचा प्रसार कितपत झाला आहे हे कळून येईल, तो नष्ट करता येणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. चाचणी किट्स मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने, सरकारने परदेशातून ज्या व्यक्ती आल्या आणि ज्यांच्यामध्ये पॉझिटीव्ह लक्षणे आढळून आली, अशांना प्राधान्य दिले. कोरोनाचा प्रसार हा चार टप्प्यांमध्ये होईल हे लक्षात घेत, परदेशातून आलेले लोक आणि त्यांच्या नातेवाईकांना विलग करण्यात आले आहे आणि आवश्यक रोगनिदान चाचण्या करण्यात आल्या. सरकारने 24 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामागे असा विचार होता की कोरोनाची साखळी मोडण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी पुरेसा असेल. यादरम्यान, विषाणूचा सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक तयारी करण्यात आली आणि आवश्यक वैद्यकीय पायाभूत सुविधांची खात्री करण्यात आली. कोरोनाचा प्रसार एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे होत आहे असा गंभीर संशय आहे. कारण, कर्नाटकमध्ये 22 तसेच महाराष्ट्रात आढळून आलेली 11 टक्के प्रकरणे ही परदेशातून आलेल्या व्यक्ती किंवा त्यांच्याशी संबंधित नव्हती. त्यामुळे, लक्षणे आढळून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची मोठ्या प्रमाणात चाचणी आवश्यक आहे आणि ज्यांना रोगाचे निदान झाले त्यांच्यावर ताबडतोब उपचार होणे गरजेचे आहे.
खोकला, ताप, ऋतूनुसार होणाऱ्या अॅलर्जी जगभरात सर्वत्र आढळून येतात. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, सुरुवातीला कोरोनाची अशाच प्रकारची लक्षणे आढळून येतात, मात्र कुपोषित, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह, रक्तदाब यासारख्या गंभीर आजारांशी सामना करणाऱ्या व्यक्तींवर हा विषाणू जीवघेणा हल्ला करतो. 1918 साली स्पॅनिश-फ्लूसारख्या उद्रेक होणाऱ्या कोरोनाबाबत तरुणांनीदेखील जागरकता बाळगावी, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. मार्चमध्ये संस्थेने सांगितले होतो की, 'सर्व देशांसाठी आम्ही समान संदेश देत आहोत. सर्व संशयित प्रकरणांची तपासणी करा.' जेव्हा आरोग्य संघटनेने इशारा जारी केला, चीनने सार्स 2003 चा अनुभव घेऊन, महिना अखेरीस 3 लाख 20 हजार लोकांची चाचणी केली होती. सार्स ओळखणाऱ्या हाँगकाँग टीमच्या साह्याने देशाने रोगनिदान चाचणीचे किट्स तयार केले आणि युद्धपातळीवर ते उपलब्ध करुन दिले.