हैदराबाद : आंध्र प्रदेश जमीन धारणा कायदा, 2022 (2023 चा 27 वा कायदा) 31.10.2023 रोजी शासन निर्णय क्र. 512, Rev, (Lands I), Dept., dt.01-11-2023 रोजी लागू झाला. त्यानंतर लवकरच जिल्हा न्यायपालिकेत प्रॅक्टिस करणारे वकिल (आधी अधीनस्थ न्यायालये म्हणून ओळखले जाणारे) न्यायालयाच्या कामावर बहिष्कार घालत आहेत. कारण त्यात दिवाणी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र काढून सध्याच्या न्याय वितरण प्रणालीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे नुकसान होत आहे. तसंच ही कामं महसूल अधिकाऱ्यांकडे सोपवली आहेत. सरकारच्या कार्यकारी शाखेचा हा एक भाग आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे नीती आयोगाने निदर्शनास आणून दिलं आहे की, देशातील न्यायालयांमधील 66% दिवाणी खटले जमिनीच्या वादाशी संबंधित आहेत. यामध्ये बदल करण्यासाठी आणि IMF तसंच जागतिक बँकेच्या पाठिंब्याने जमिनीच्या मालकी हक्क आणि त्यांचे डिजिटायझेशन हा व्यवसाय सुलभतेचा महत्त्वाचा घटक म्हणून त्यावर भर देण्यात आला आहे. नीति आयोगाने 2019 मध्ये आदर्श कायद्याची शिफारस केली होती. आदर्श विधेयक आणि AP कायदा हे संविधानाच्या विरुद्ध आहेत आणि भूतकाळात देशात आतापर्यंत कधीही न पाहिलेले वाद, जमीन बळकावणे आणि खटला चालवण्याचा धोका यामध्ये आहे. 1978 पर्यंत भारतीय राज्यघटनेच्या कलम 30 अन्वये “मालमत्तेचा अधिकार” हा मूलभूत अधिकार होता आणि राज्यघटनेच्या 44व्या दुरुस्ती कायद्याद्वारे, 1978 मध्ये तो मूलभूत अधिकार म्हणून काढून टाकण्यात आला आणि त्याऐवजी सध्याच्या कलम 300-अ अंतर्गत घटनात्मक अधिकार बनला. राज्यघटनेतील मुलभूत हक्क म्हणून संपत्तीचा अधिकार काढून टाकणे ही एक मोठी चूक होती हे इतिहास आपल्याला दाखवतो.
कायद्याची ठळक वैशिष्ट्ये :वास्तविक आदर्श विधेयकाचा हेतू हा जमिनीच्या नोंदींची एक आदर्श प्रणाली तयार करणे हा होता. यातून इतर गोष्टींबरोबरच मालमत्तेमध्ये जलद, सुरक्षित व्यवहार करता येतील. सध्या असा दावा केला जातो की सध्याच्या नोंदणी कायदा, 1908 अंतर्गत नोंदणी प्राधिकरण नोंदणीसाठी दस्तऐवज आणणाऱ्या व्यक्तीच्या नावाची पडताळणी करू शकत नाही, एकाच मालमत्तेच्या तुकड्यावर अनेक दावे आहेत. यातून अनेक प्रमाद घडताना दिसत आहेत. दुसरीकडे मालकी हक्क वैधता यासारखे महत्वाचे मुद्दे मालमत्ता हस्तांतरण कायदा, 1882 आणि हिंदू उत्तराधिकार कायदा, 1956 च्या कक्षेत आहेत. AP कायद्याच्या कलम 7(3) मध्ये दावा काय आहे याची विस्तृत व्याख्या करते. यातील तरतुदींचा विचार करता अनेक दावे निरस्त होतील अशी परिस्थिती आहे. दुर्दैवाने, प्रमाणित प्रती घेणे आणि निर्णयाचे अपील करणे यासाठी जास्तीत जास्त १५ दिवसांचा वेळ मिळत असल्यानं ज्यांच्याकडे साधने नाहीत त्यांना काहीच करता येणे शक्य होत नाही.
या कायद्यात असे नमूद केले आहे की स्थावर मालमत्तेच्या तुकड्यावर कोणताही दावा असलेल्या सर्वांनी त्यांचा दावा APLA कडे नोंदवावा आणि या अनिवार्य नोंदणीसाठी कमाल कालावधी दोन वर्षे आहे. जर वाद असेल तर ती मालमत्ता "विवाद नोंदणी" मध्ये प्रविष्ट केली जाते. व्यावहारिकदृष्ट्या अशी तरतूद विविध कारणांमुळे चिंताजनक आहे. कारण जर कोणत्याही योगायोगाने दावा दुसर्या दावेदाराने नोंदवला असेल आणि दाव्याच्या मूळ धारकाकडे माहिती नसेल आणि कोणताही वाद उद्भवला नसेल तर तो नोंदवणाऱ्या व्यक्तीच्या दाव्याची खरी माहिती विचारात न घेता मालकीला अंतिमता प्राप्त होईल. किंबहुना दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांसह मालकी हक्काचे सर्व वाद APLA ला कळवावे लागतात. ज्यामुळे आधीच त्रासलेल्या व्यक्तींना अनुपालन खर्च वाढतो. याबाबतचा अहवाल देणे ही समस्या नसली तरी, या अहवालासाठी कागदपत्रे भरणे आणि फी भरणे आवश्यक आहे. तर शुल्क नाममात्र असेल याची कुठेही खात्री नाही. त्यामुळे, अशी शक्यता आहे की सरकार याला सोन्याची अंडी देणारी कोंबडी मानू लागतील आणि आकारणी शुल्कात वाढ करत राहतील. जसं की नोंदणीचा खर्च वाढवला जात आहे.
बदल : एक महत्त्वाचा बदल ज्याकडे मोठ्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही ते म्हणजे तोंडी करारांना परवानगी देणारा करार कायदा, 1872 च्या विपरीत, नवीन कायद्यामध्ये मौखिक मत वगळण्यात आली आहेत. लिखित नोंद करणे, दस्तऐवजीकरण करणे अनिवार्य झाले आहे. याचा परिणाम असा होतो की एका झटक्यात दाव्यांची नोंदणी आणि पालनाची संपूर्ण जबाबदारी मालमत्ता मालकावर येते. या गोष्टी वेळेत झाल्या नाहीत, तर मालकी हक्क गमावण्याची वेळ येते. राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड (NJDG) नुसार दिवाणी न्यायालयात 1.097 टक्के दिवाणी खटले प्रलंबित आहेत. पण वास्तव पाहता 95% ग्रामीण कुटुंबे आणि 65% भारतीय कुटुंबांकडे मालमत्ता आहे. त्यामुळे, NITI आयोग कदाचित अधिक विश्लेषणात्मक स्वरूपाचा डेटा वापरण्याऐवजी सोयीस्कर डेटा वापरत असेल कारण विविध प्रकारचे नागरी वाद आहेत. त्याची नोंदच निती आयोगाने घेतली नसल्याचं म्हणण्यास वाव आहे.