महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 17, 2020, 2:36 PM IST

Updated : Oct 17, 2020, 3:18 PM IST

ETV Bharat / opinion

बिहार निवडणूक : नितिश यांच्यासमोरील आव्हाने...

नितिश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासमोर (संजद ), राजद, सीपीआय (एमएल), सीपीआय (एम) आणि सीपीआय यांच्या संयुक्त आघाडीपेक्षाही एनडीएतील त्यांचा पूर्वाश्रमीचा भागीदार लोकजनशक्ति पक्षाचेच जास्त अवघड आव्हान आहे. संजद आणि एलजेपी दोन्ही पक्षांची भाजपशी असलेली आघाडी अतूट असली तरीही, सध्याचे एलजेपीचे सर्वेसर्वा, चिराग पासवान यांनी केवळ संजदच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करू, असे जाहिर केले आहे.

बिहार
बिहार

कोलकता - 2020 च्या अत्यंत महत्वाच्या अशा बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अगदी काहीच दिवस उरले असताना, मुख्यमंत्री नितिश कुमार यांना सलग चौथ्या वेळेला राज्य प्रशासनाचे प्रमुख पद मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये अनेक प्रकारच्या आणि गंभीर आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे, असे वाटते.

नितिश कुमार यांच्या संयुक्त जनता दलासमोर (संजद ), राजद, सीपीआय (एमएल), सीपीआय (एम) आणि सीपीआय यांच्या संयुक्त आघाडीपेक्षाही एनडीएतील त्यांचा पूर्वाश्रमीचा भागीदार लोकजनशक्ती पक्षाचेच जास्त अवघड आव्हान आहे. संजद आणि एलजेपी दोन्ही पक्षांची भाजपशी असलेली आघाडी अतूट असली तरीही, सध्याचे एलजेपीचे सर्वेसर्वा, चिराग पासवान यांनी केवळ संजदच्या विरोधात आम्ही उमेदवार उभे करू, असे जाहीर केले आहे.

बिहारमध्ये जेव्हा कुमार कनिष्ठ जातींच्या मतदारांचा विश्वास मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तेव्हाच, स्वतंत्र महादलित क्षेत्र तयार करून त्याद्वारे जातीभेदावर आधारित राजकारणाचे वर्चस्व असलेल्या राज्यात, एलजेपी संस्थापक आणि केंद्रिय मंत्री रामविलास पास्वान यांच्या अचानक निधनामुळे कुमार यांना जोरदार धक्का बसला आहे. कनिष्ठ जातीतून आलेल्या पासवान यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट संजदच्या दलित अनुयायांमध्ये मुसंडी मारून निर्माण करून लोजपासाठी मतांची बेगमी करणार, हे निश्चित आहे. या परिवर्तनाचा लाभ एकतर लोजपाला होईल किंवा एकत्रित विरोधी आघाडीला होईल.

महागठबंधन संयुक्त जनता दल आणि लोजपा यांच्यात दलित मते विभागली जाऊन त्याचा फायदा आपल्याला होईल, अशी आशा करत आहे. कुमार यांच्या विरोधात जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासार्ह राजपूत चेहऱ्याचा पक्षात असलेला अभाव हीच आहे. खरेतर, बिहारमध्ये भाजपालाही याच समस्येने झपाटले आहे.

243 विधानसभा मतदारसंघांपैकी, किमान 45 मतदारसंघांमध्ये राजपूत व्होट बँक हा महत्वाचा घटक आहे. दुसरीकडे, राजदकडे अजूनही विश्वासार्ह राजपूत चेहरा जगदानंद सिंग यांच्या रूपाने आहे. जरी, सर्वाधिक लोकप्रिय राजपूत चेहरा असलेले स्वर्गीय रघुवंशसिंह प्रसाद यांच्या ज्येष्ठ पुत्राने सत्यप्रकाश सिंह यांनी संजदमध्ये प्रवेश केला असला तरीही, राजपूत मते मिळवण्यासाठी, सिंग यांच्या प्रतिमेचा फायदा कुमार कितपत उठवू शकतात, हे आताच सांगणे फार घाईचे होईल.

दुसरे प्रमुख आव्हान जे मुख्यमंत्र्यांसमोर आहे ते म्हणजे राज्याची ढासळत जाणारी अर्थव्यवस्था, उद्योग क्षेत्राची दुरवस्था आणि रोजगाराच्या संधीचा अभाव ही आहेत. प्रमुख विरोधी पक्ष विशेषतः राजदने हा निवडणुकीतील प्रमुख मुद्दा बनवला आहे. राजदचे नेते आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते, लालूप्रसाद यादव यांचे पुत्र, तेजस्वी प्रसाद यादव यांनी सर्व निवडणूक प्रचारसभांमध्ये बिहारमधील बेरोजगारीचा दर हा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. बिहारमध्ये बेरोजगारीचा दर 46.6 टक्के असून हा देशात सर्वोच्च आहे.

कुमार यांच्यावर त्यांनी राज्यातील रिक्त पदे न भरून विस्थापनाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे आणि विरोधी आघाडी सत्तेवर आल्यास 10 लाख कायम सरकारी नोकऱ्या पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. बिहारमध्ये दारूबंदीची अंमलबजावणी करण्याच्या कुमार यांच्या निर्णयामुळे राज्याच्या स्वतःच्या कर उत्पन्नावर तर विपरित परिणाम झालाच आहे. परंतु त्यामुळे राज्यातील पर्यटन व्यवसाय अक्षरशः कोसळून पडला आहे, याबद्दल सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अनेक हॉटेल्स यामुळे बंद पडली असून हजारो लोक बेरोजगार झाले आहेत.

खरेतर, कुमार यांना स्वतःलाही बेरोजगारीचा विषय आपल्याला येत्या निवडणुकीत त्रासदायक ठरू शकतो,. याची जाणिव झालेली दिसते. 14 ऑक्टोबरला, त्यांनी आभासी माध्यमातून 11 विधानसभा मतदारसंघांतील लोकांशी संवाद साधताना प्रत्येकाला नोकरी देईल, असे कोणतेही राज्य देशात नाही आणि जगात कोणताही असा देश नाही, असे म्हटले होते.

अंतिमतः, हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद- अल-मुस्लिमीन आणि माजी केंद्रिय मंत्री उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पार्टीसारख्या जातीवर आधारित पक्षांची आघाडी, विशाल लोकशाही धर्मनिरपेक्ष मोर्चाने बहुजन समाज पार्टीच्या मायावती, समाजवादी जनता दलाचे माजी केंद्रिय नेते देवेंद्र प्रसाद आणि ओमप्रकाश राजभर यांची सुहेलदेव भारतीय समाज पार्टी यांची आघाडीही संजद गोटावरील तणाव वाढवत आहे. ओवेसी जर संजदच्या मुस्लिम व्होट बँकेत आणि आरएसएलपी कुशवाहा, कोएरी आणि कुर्मी मतबँकेत घुसखोरी करू शकले तर, संजदविरोधात अनेक समीकरणे जाऊ शकतात.

विशेषतः नितिश कुमार स्वतः कुर्मी जातीतून येतात. कुमार यांच्यासाठी ही प्रमुख आव्हाने असली तरीही, विरोधकांसमोरही प्रचंड अडथळे आहेतच. पहिले आव्हान तेजस्वी प्रसाद यादव आणि चिराग पासवान या दोघांकडेही सरकार चालवण्याचा अनुभव नाहि, हे आहे. नितिश कुमार आणि त्यांचा पक्ष या गोष्टीवर ठळक प्रकाश टाकण्याचा प्रचारात प्रयत्न करत आहे. दुसरी नकारात्मक गोष्ट जी कुमार यांच्यासाठी सकारात्मक ठरू शकते ती म्हणजे एकत्रित आघाडीचे आणि लोजपाचे प्रचारातील दोन सर्वाधिक लोकप्रिय चेहरे यावेळी नाहित. राजद सर्वेसर्वा, लालूप्रसाद यादव हे सध्या 2017 मध्ये घडलेल्या चारा घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर 27.5 वर्षांचा कारावास भोगत आहेत. ते यंदा प्रचारमोहिमेत नसतील. तर रामविलास पासवान यांच्या अचानक निधन झाले, ही गोष्ट नितिश कुमार यांना प्रचाराच्या टप्प्यात विरोधकांच्या पुढे काही पावले ठेवणार आहे.

लेखक - सुमंतराय चौधरी, ब्युरो चीफ कोलकता, ईटीव्ही भारत

Last Updated : Oct 17, 2020, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details