अनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी ते वेगवेगळे प्रयत्नही करत असतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपला आहारात संतुलित असणे गरजेचे आहे. तसेच यासोबत व्यायामाचे नियोजन करणेही आवश्यक असते. परंतु, याव्यतिरिक्त काही गोष्टी तुमचं वाढलेले वजन कमी करू शकतात.
अनेकांना दररोज व्यायाम करण्याचा कंटाळा येतो. परंतु, कोणताही व्यायाम न करता तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तुम्हाला माहीत आहे का? काही पदार्थ खाण्याऐवजी त्यांचा गंध घेतल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. हा निष्कर्ष एका संशोधनामधून स्पष्ट झाला आहे. या फळांचा फक्त गंधच आपल्या शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. चला तर मग जाणून घेऊया या फळांविषयी...
हिरवे सफरचंद आणि केळी -
वजन वाढलेल्या व्यक्तींनी भूक लागल्यावर हिरवे सफरचंद आणि केळी यांचा वास घेतला तर त्यांचे वजन कमी होण्यास मदत होते. या फळांना असणारा नैसर्गिक गोड गंध भूक भागवण्यासाठी मदत करतो, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे.
लसूण-