महाराष्ट्र

maharashtra

कॉफीचे सेवन सायकलिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी लाभदायक!

By

Published : Dec 1, 2019, 9:53 PM IST

कॉफीचे सेवन करणे हे सायकलिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी फायद्याचे असल्याचे, एका नविन संशोधनात समोर आले आहे. 'न्यूट्रीयन्टस्' नावाच्या आरोग्यविषयक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

कॉफीचे सेवन सायकलिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी लाभदायक
कॉफीचे सेवन सायकलिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी लाभदायक


वॉशिंग्टन डी. सी. -सामान्यपणे आपल्या दिनक्रमात आपण चहा किंवा कॉफीचे सेवन करतोच. चहा-कॉफीचे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत अनेक संशोधन झाले आहेत. कॉफीचे सेवन करणे हे सायकलिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी फायद्याचे असल्याचे, एका नवीन संशोधनात समोर आले आहे.

हेही वाचा - प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या पुरुषांना दिलासा; नवीन संशोधनामुळे केमोथेरपी पासून सुटका

'न्यूट्रीयन्टस्' नावाच्या आरोग्यविषयक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनानुसार जे खेळाडू सायकलिंग करतात त्यांच्या शरीरावर कॉफीचे चांगले परिणाम दिसून येतात. यासाठी 38 खेळाडूंचा अभ्यास करण्यात आला. यांमध्ये 19 महिला खेळाडू आणि 19 पुरूष खेळाडूंचा समावेश करण्यात आला. पुरूष आणि महिला या दोन्हींच्या शरीरावर कॉफी सेवनाचे सारखेच परिणाम दिसून आले. सायकलिंग करण्यापुर्वी कॉफीचे सेवन केल्याने त्यातील 'कॅफिन' या घटकामुळे कामगिरी सुधारण्यास मदत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details