महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

'नोकिया १०५' लाँच ; चार्जिंग २६ दिवस टिकत असल्याचा कंपनीचा दावा

नोकिया १०५ या मॉडेलची भारतात १ हजार १९९ रुपये किंमत आहे. हे मॉडेल निळ्या, गुलाबी आणि काळ्या रंगात उपलब्ध असणार आहे.

Breaking News

By

Published : Aug 20, 2019, 5:26 PM IST

नवी दिल्ली - देशात सर्वप्रथम परवडणाऱ्या दरातील मोबाईल उपलब्ध करून देणाऱ्या नोकियाचे १०५ हे मॉडेल लाँच करण्यात आले आहे. हे मॉडेल एचएमडी ग्लोबल कंपनीकडून देशात विकण्यात येणार आहे. चार्जिंग २६ दिवस टिकत असल्याचा कंपनीने दावा केला आहे.


नोकिया १०५ या मॉडेलची भारतात १ हजार १९९ रुपये किंमत आहे. हे मॉडेल निळ्या, गुलाबी आणि काळ्या रंगात उपलब्ध असणार आहे. नोकिया कंपनीच्या वेबसाईटसह ठरावीक किरकोळ दुकानात मॉडेल मिळू शकणार आहे.

नोकिया १०५ या मॉडेलची जगभरात १ कोटी विक्री झाली आहे. यातून त्याची लोकप्रियता आणि काळानुरूप गुणवत्ता सिद्ध होत असल्याचे एचएमडी ग्लोबलचे सीपीओ जुहो सर्विकास यांनी सांगितले. पहिल्यांदाच मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर लक्ष्य केंद्रित करून या मॉडेलची रचना करण्यात आली आहे.
हे आहेत फीचर-

  • मोबाईलमध्ये २ हजार संपर्क क्रमांक आणि ५०० एसएमएस संग्रहित करणे शक्य आहे.
  • हा मोबाईल नोकिया सिरीज ३० + सॉफ्टवेअर आणि ४ एमबीच्या रॅमवर चालतो.
  • मोबाईलला १.७७ इंच क्यूक्यूव्हीजीएचा डिस्पले आहे.
  • मोबाईलमध्ये दोन मिनी सिमकार्ड बसू शकतात.
  • मोबाईलमध्ये एफएम रेडिओ आणि टॉर्चलाईट आहे.
  • नोकियामध्ये स्नेक, स्काय गिफ्ट, एअरस्ट्राईक, टेट्रिस असे खेळ आहेत. मोबाईलची बॅटरी ८०० एमएएच असून चार्जिंग २६ दिवस टिकते.

ABOUT THE AUTHOR

...view details