नवी दिल्ली- आयटेल स्मार्टफोनचे नवीन मॉडेल लाँच करणार आहे. सूत्राच्या माहितीनुसार आयटेल अॅमेझॉनवर एचडी प्लस डिस्प्ले व प्रिमियम लूक असलेला स्मार्टफोन १ फेब्रुवारीला लाँच करणार आहे.
आयटेल स्मार्टफोनमध्ये कव्हर्ड डिस्प्लेबरोबर ५.५ इंचची स्क्रीन असणार आहे. फोनमध्ये ड्युल सिक्युरिटीबरोबर २ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेजची सुविधा असणार आहे. ग्राहकांना अधिक चांगली सुविधा मिळावी, यासाठी जास्तीत सुविधा देण्याचा प्रयत्न केल्याचा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन ६ हजार रुपये किमतीच्या श्रेणीमध्ये लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने नुकतेच आयटेल व्हिजन १ प्रो लाँच केला होता. या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रीमियम फीचर देण्यात आले होते.
हेही वाचा-आर्थिक सर्वेक्षणात केवळ सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक - पी. चिदंबरम