नवी दिल्ली- अमेरिकेने निर्बंध लागू केल्याने हुवाईला अमेरिकेत उत्पादन होणाऱ्या चिप्सचा मर्यादित वापर करावा लागत आहे. अशा स्थितीत हुवाईने मेट ४० सिरीज प्रोमध्ये या चिप्सचा वापर केला आहे.
हुवाई कंपनीने हुवाई मेट ४० प्रो लाँच केल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
हुवाई मेट ४० प्रोची ही आहेत वैशिष्ट्ये-
- एज टू एज ८८ अंशाचा हॉरिझन डिसप्ले आहे.
- जल आणि धूळ प्रतिबंधक आहे. याचा अर्थ पाणी आणि धुळीने मोबाईल खराब होत नाही.
- यामध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित कॉम्प्युटिंग मेकॅनिझम आहे. त्यामुळे मल्टीटास्क करणे सहजशक्य आहे.
- २४ कोअर मॅली-जी७८ जीपीयूमुळे चांगल्या दर्जाचे फोटो दिसतात. तसेच गेमिंचा चांगला अनुभव येतो.
- ५ जी आणि ४जीचे सीमकार्ड एकाचवेळी वापरता येते.
- वायफाय ६+ ला सपोर्ट करते.
- ४४०० एमएएच८ ही मोठी क्षमता असलेली बॅटरी आहे. त्यामध्ये अपग्रेडेड ६६ डब्ल्यू हुवाई सुपरचार्ज आणि ५० डब्ल्यू वायरलेस हुवाी सुपरचार्जची सुविधा आहे. त्यामुळे वेगाने बॅटरी चार्जिंग होण्यास मदत होते.
- ईएमयूआय ११ ही चांगली ऑपरेटिंग सिस्टिम आहे.
- थ्रीडी फेस अनलॉकिंग सिस्टिम आहे. त्यामुळे सुरक्षेचा चांगला अनुभव येतो.
कॅमेरा
- अल्ट्रा व्हिजन कॅमेरा : ५० मेगापिक्सेल, एफ/१.० एपरटूर, १/१.२८ इंच सेन्सर, ओक्टा पीडी ऑटोफोकसचे फीचर आहे. त्यामुळे फोटोचा दर्जा उत्तम येतो.
- अल्ट्रा वाईड सिने कॅमेरा: हा कॅमेरा २० मेगापिक्सेलचा आहे. त्यामध्ये चांगले क्षण टिपता येतात.
- अचूक आणि वेगाने फोकससाठी लेझर सेन्सर आहे.
- टेलिफोटो कॅमेरा १२ मेगापिक्सेलचा आहे.
-
सेल्फीसाठी १० मेगापिक्सेल कॅमेरा आहे.