नवी दिल्ली - अॅपलच्या नव्या लाँचिंगची वाट पाहणाऱ्या वापरकर्त्यांची प्रतिक्षा संपली आहे. कारण, अॅपलने आयफोन 13 लाँच केला आहे. आयफोन 13 ची भारतामध्ये किती किंमत असेल याची माहितीही कंपनीने जाहीर केली आहे.
आयफोन 13 प्रो हा भारतामध्ये 1,19,900 रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर आयफोन 13 प्रो मॅक्स हा 1,29,900 रुपयांना उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना 17 सप्टेंबरपासून अॅपलचे स्टोअर apple.com/in/store वरून नवीन आयफोनची खरेदी करता येणार आहे.
हेही वाचा-संशयित दहशतवादी ओसामाने पाकिस्तानात घेतले 15 दिवस प्रशिक्षण; बापासह काकानेही केली मदत
ऑस्ट्रेलिया, कॅनडा, चीन, जर्मनी, भारत, जपान, यूके, अमेरिका आणि 30 हून अधिक देशांसह भागांधून ग्राहक आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्सची आगाऊ ऑर्डर करू शकतात. ही ऑर्डर ग्राहकांना 17 सप्टेंबर पहाटे 5 वाजल्यापासून करता येणार आहेत. तर ग्राहकांना 24 सप्टेंबरपासून आयफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. आयफोन 13 प्रो आणि आयफोन 13 प्रो मॅक्स हे ग्राफाईड, सोनेरी, चंदेरी आणि सिएर्रा ब्लूय रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
नवीन आयफोन मॉडेलच्या किमती हेही वाचा-कन्हैया कुमार लवकरच काँग्रेसमध्ये?, राहुल गांधी यांची घेतली भेट
आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 मिनीच्या किमती मागील वर्षाप्रमाणेच राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना आयफोन 13 मिनी हा 79,900 रुपये तर आयफोन 13 मिनी हा 69,900 रुपयांना खरेदी करता येणार आहे. अॅपल आणि आयफोन 13 मिनी आयफोन हा गुलाबी, निळा, मिडनाईट, स्टारलाईड आणि लाल अशा पाच रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा-Time Influential List: टाईमच्या जगातील 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत मोदी, ममता बॅनर्जी अन् आदर पूनावाला
नवीन आयफोन 13 आणि आयफोन 13 मध्ये लहान नॉच असणार आहे. हा नॉच 20 टक्के अधिक लहान, सुपर रेटिना एक्सडीआर डिसप्ले आहे. हा डिसप्ले 28 अधिक प्रकाशमय आणि 1200 निट्स पीक प्रखर प्रकाश असलेला आहे. आयफोन 13 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिसप्ले आहे.
आयफोन 13 स्पोट्समध्ये ए15 बायोनिक चिपसेट आहे. त्यामुळे सध्याच्या चिपच्या तुलनेत 50 टक्क्यांपर्यत अधिक वेग मिळत असल्याचा अॅपलचा दावा आहे. तर 30 टक्के अधिक चांगले ग्राफिकचे सादरीकरण होत असल्याचे अॅपलने म्हटले आहे.