नवी दिल्ली- पब्जी मोबाईल भारतामध्ये बॅटलग्राऊंडस मोबाईल इंडिया या नावाने लाँच होणार आहे. त्यासाठी आगाऊ नोंदणी होणार आहे. पब्जी हा गेम १८ मेपासून सुरू होणार असल्याचे दक्षिण कोरियन कंपनी क्राफ्टनने म्हटले आहे.
पब्जी गेमसाठी आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना रिवार्ड मिळणार असल्याचे क्राफ्टन कंपनीने म्हटले आहे. हे रिवार्ड केवळ भारतीय प्लेयरला मिळणार आहेत. आगाऊ नोंदणी करण्यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन प्री रजिस्ट बनट क्लिक करावे. त्यानंतर गेम लाँच झाल्यानंतर हे रिवार्ड आपोआप मिळणार आहेत.
हेही वाचा-चिनी कंपनी टेन्सेंटचे देशातील पब्जीच्या वितरणाचे अधिकार रद्द; दक्षिण कोरियन कंपनीचा निर्णय
बॅटलग्राऊंडस मोबाईल इंडिया गेम केवळ मोबाईल डिव्हाईससाठी लाँच होणार आहे. तसेच केवळ भारतात खास लाँच होणार आहे. नुकतेच कंपनीने पब्जी नव्या अवतारात लाँच होणार असल्याचे समाज माध्यमांमध्ये जाहीर केले होते.
हेही वाचा-पब्जी खेळण्यास मनाई केल्याने मुलाने चिरला वडिलांचा गळा; प्रकृती अत्यवस्थ
काय म्हटले आहे कंपनीने?
पब्जीची मालकी असलेल्या क्राफ्टोन कंपनीने वैयक्तिक गोपनीयता आणि डाटा सुरक्षेसाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यासाठी भागीदारांबरोबर प्रत्येक टप्प्याबरोबर काम असल्याचे म्हटले आहे. वैयक्तिक डाटाचा आदर राखण्यात येणार आहे. सर्व डाटा आणि माहिती ही भारत सरकारच्या नियमाप्रमाणे देशामध्येच सुरक्षित केली जाणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार जागतिक दर्जाचा मल्टीप्लेयर गेमिंगचा अनुभव वापरकर्त्यांना मोबाईलवर घेता येणार आहे. बॅटलग्राऊंडस मोबाईल इंडिया काही गेम इव्हेंट लाँच करणार आहे. त्यामध्ये टुर्नामेंट आणि लीगचाही समावेश असणार आहे. विशेष म्हणजे वापरकर्त्यांना मोबाईलवर हा गेम मोफतपणे खेळता येणार आहे.
पब्जीवर भारताने घातली होती बंदी-
दरम्यान, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि देशाचे सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्याकरता भारताने २ सप्टेंबर २०२० ला १११ मोबाईल अॅपवर बंदी लागू केली होती. त्यामध्ये पब्जीचाही समावेश होता. पब्जीचे जगात ६० कोटी डाऊनलोड आणि ५ कोटी सक्रिय वापरकर्ते आहे. तर भारतामध्ये ३.३ लाख वापरकर्ते होते.