महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

एलजीचा ३२ इंचीचा गेमिंग मॉनिटर लाँच

एलजीने ३२ इंचाचा अल्ट्रागियर मॉनिटर ३२जीपी८५० हा लाँच केला आहे. या मॉनिटरची किंमत ७२० डॉलर आहे.

gaming monitor
एलजी ३२ इंचीचा गेमिंग मॉनिटर

By

Published : Jun 1, 2021, 10:59 PM IST

नवी दिल्ली- एलजी इलेक्ट्रॉनिक्सने ३२ इंचाचा गेमिंग मॉनिटर लाँच केला आहे. हा नवीन गेमिंग मॉनिटर येत्या आठवड्यात दक्षिण कोरियात उपलब्ध होणार आहे. कोरोनाच्या काळात घरातून गेमिंगचे प्रमाण वाढत असताना कंपनीला विक्री वाढण्याची अपेक्षा आहे.

एलजीने ३२ इंचाचा अल्ट्रागियर मॉनिटर ३२जीपी८५० हा लाँच केला आहे. या मॉनिटरची किंमत ७२० डॉलर आहे. अतिरिक्त ३२जीपी८५० हा लाँचिंगनंतर पूर्वीच्या १९ मॉनिटर पोर्टफोलिओमध्ये भर पडणार आहे. या मॉनिटरचा आकार हा २४ इंच ते ३८ इंच असणार आहे. मॉनिटरमध्ये नॅनो डिस्प्ले हा क्वाड हाय डेफिनेशनमध्ये २५६०X१,४४० पिक्सेल आणि १८० एचझेड रिफ्रेश रेट आहे.

हेही वाचा-कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार


गेमिंग बाजारपेठेत वृद्धी होण्याची अपेक्षा
दक्षिण कोरियात २०१८ सुमारे १,३०,००० गेमिंग मॉनिटरची विक्री झाली होती. हे प्रमाण वाढून गतवर्षी ३,६०,००० मॉनिटरची विक्री झाली आहे. एलपीजीकडून गेमिंग मॉनिटरची जगभरात विक्री केली जाणार आहे. चालू वर्षात जगभरात १.५ कोटी मॉनिटरची निर्यात होईल, असा अंदाज आहे. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ७.३ टक्क्यांनी अधिक असणार आहे. गेमिंग मॉनिटरच्या बाजारपेठेचा एकूण मॉनिटरच्या बाजारपेठेत १७.३ टक्के हिस्सा आहे.

हेही वाचा-गेल्या चाळीस वर्षातील सर्वात अंधकारमय वर्ष...घसरलेल्या जीडीपीवरून पी. चिदंबरम यांची टीका

भारतीय व्हिडिओ गेमकरता आठवडाभरात साडेआठ तास करतात खर्च!

भारतीय गेमर्स हे आठवडाभरात सरासरी ८ तास आणि २७ मिनिटे गेम खेळतात. ही माहिती व्हिडीओ डिलिव्हरी आणि एज क्लाउड सर्व्हिस कंपनीने अहवालामधून दिली आहे.जगभरात व्हिडिओ गेम खेळण्याच्या प्रमाण कमालीचे वाढले आहे. ग्राहकांचे व्हिडिओ गेम खेळण्याचे प्रमाण वर्षभरात १४ टक्क्यांनी वाढले आहे. कोरोना महामारीत अनेकांना घरी राहावे लागे आहे. अशावेळी मनोरंजनाचे साधन म्हणून गेमिंगची लोकप्रियता वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details