महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

भारतीय व्हिडिओ गेमकरता आठवडाभरात साडेआठ तास करतात खर्च! - भारतीय व्हिडिओ उद्योग न्यूज

जगभरात व्हिडिओ गेम खेळण्याच्या प्रमाण कमालीचे वाढले आहे. ग्राहकांचे व्हिडिओ गेम खेळण्याचे प्रमाण वर्षभरात १४ टक्क्यांनी वाढले आहे.

व्हिडिओ गेम
व्हिडिओ गेम

By

Published : Mar 16, 2021, 8:09 PM IST

नवी दिल्ली -भारतीय गेमर्स हे आठवडाभरात सरासरी ८ तास आणि २७ मिनिटे गेम खेळतात. ही माहिती व्हिडीओ डिलिव्हरी आणि एज क्लाउड सर्व्हिस कंपनीने अहवालामधून दिली आहे.

जगभरात व्हिडिओ गेम खेळण्याच्या प्रमाण कमालीचे वाढले आहे. ग्राहकांचे व्हिडिओ गेम खेळण्याचे प्रमाण वर्षभरात १४ टक्क्यांनी वाढले आहे. कोरोना महामारीत अनेकांना घरी राहावे लागे आहे. अशावेळी मनोरंजनाचे साधन म्हणून गेमिंगची लोकप्रियता वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-'भारतीय रेल्वेचे कधीही खासगीकरण होणार नाही'

  • सामाजिक देवाणघेवाणीतून गेमिंगमधील कार्यक्षमता वाढली आहे.
  • देशामधील गेर्मसला संधी मिळाल्याचे लाईमलाईट नेटवर्क्स इंडियाचे भारतीय प्रमुख अश्विन राव यांनी सांगितले.
  • भारतीय गेमिंग कंपन्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.
  • जगभरातील अर्धेहून अधिक ग्लोबल गेमर्स हे गतवर्षी एकमेकांचे मित्र झाले आहे. तर त्यामधील एक तृतीयांश हे एकमेकांशी संवाद साधत आहेत.
  • 2020 ते 2021 मध्ये भारतीयांचा गेमिंगसाठीचा वेळ ४.१ तासांवरून ५.५ तास झाला आहे. यामागे महामारी हे कारण आहे.

हेही वाचा-हिरोच्या ५० हजार इलेक्ट्रिक वाहनांची वर्षभरात विक्री

ABOUT THE AUTHOR

...view details