नवी दिल्ली- ट्विटरच्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ट्विटरने डायरेक्ट मेसेजमध्ये (डीएम) १४० सेकंदापर्यंतच्या ध्वनी संदेशाची देशात चाचणी घेतली आहे. हा प्रयोग टप्प्याटप्प्याने वापरकर्त्यांसाठी लागू होणार आहे. विशेष म्हणजे हे वैशिष्ट्य भारतासह केवळ ब्राझील आणि चीनमध्ये उपलब्ध होणार आहे.
ट्विटरच्या माहितीनुसार डीएममधील ध्वनीसंदेशाने लोकांना संभाषण करणे अधिक सोपे ठरणार आहे. ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी म्हणाले की, डीएममध्ये ध्वनी संदेशाचे प्रायोगिक पातळीवरील वैशिष्ट्य देण्यासाठी आम्ही अत्यंत उत्साही आहोत. त्यामधून लोकांना व्यक्त होण्याचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. ध्वनीसंदेशातून भावना आणि सहानुभूती अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करता येणार आहे.
हेही वाचा-महागाईचा 'कळस': नऊ दिवसात पेट्रोल-डिझेल ३ रुपयांनी महाग
ध्वनीसंदेशाचा असा करा वापर -
- डीएममध्ये जाऊन न्यू व्हाईस रेकॉर्डिंग (नवी ध्वनी मुद्रण) आयकॉनवर क्लिक करा. तिथे रेकॉर्डिंग सुरू करा.
- जेव्हा ध्वनी मुद्रण संपेल तेव्हा स्टॉप या आयकॉनवर क्लिक करा.
- हा ध्वनीसंदेश पाठविण्यापूर्वी तुम्हाला ऐकता येणार आहे.
- जर तुम्ही मोबाईलवर अँडाईड ऑपरेटिंग सिस्टिम वापरत असाल तर केवळ व्हाईस रेकॉर्डिंगवर होल्ड बटन दाबून रेकॉर्डिंग सुरू करू शकता.
- हे बटन काढल्यानंतर ते त्वरित पाठवू शकता.
- सध्या हे वैशिष्टय केवळ आयओएस आणि अँड्राईड स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या भारत, जपान आणि ब्राझीलमधील वापरकर्त्यांना वापरता येणार आहे.
- तुमचे व्हाईस ट्विट हे टाईमलाईनमध्ये दिसू शकणार आहे.
हेही वाचा-'देशाने पर्यायी इंधनाचा स्वीकार करण्याची हीच वेळ'