नवी दिल्ली - ट्विटरने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन इमोजी लाँच केले आहेत. त्यामधून वापरकर्त्याला चांगला संवाद साधणे शक्य होईल, असा ट्विटर कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे.
कोरोना महामारीमुळे बंधने आली आहेत. असे असले तरी इमोजीमुळे वापकर्त्याला परेडला अभिवादन करता येणार आहे. लोकांना उत्साहाने प्रजासत्ताक दिन साजरा करता येणार असल्याचे ट्विटर इंडियाच्या सार्वजनिक धोरणाच्या प्रमुख पायल कामत यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्विट केले. भारतीय हवाई दलानेही ट्विट करत आकाशात झेप घेणाऱ्यांचा आदर करण्याची विनंती केली आहे.