नवी दिल्ली - युट्यूबवर व्हिडिओ तयार करताना कॉपीराईट कायद्याचा भंग न टाळता चांगले संगीत मिळविणे वापरकर्त्यांना कठीण जाते. ही अडचण आता काही प्रमाणात कमी होणार आहे. कार म्युझिक रेकॉर्ड कंपनी टिप्स इंडस्ट्रीजने गुगलला संगीत परवाना देण्याचा करार केला आहे. त्यामुळे युट्युबरला शॉर्ट्सचे व्हिडिओ तयार करताना टिप्सचे संगीत व गाणे वापरता येणार आहेत. त्यामुळे कॉपीराईटचा भंगही होणार नाही.
युट्युब शॉर्टस ही गुगलने नुकतेच सुरू केलेली शॉर्ट व्हिडिओ सेवा आहे. त्यामध्ये वापरकर्ते, क्रियटर आणि आर्टिस्टला युट्युबवर शॉर्ट व्हिडिओ तयार करता येतात. टिप्सचा गुगलबरोबर करार झाल्याने वापरकर्त्यांना टिप्सचे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले संगीत उपलब्ध होणार आहे. टिप्स लायब्ररीमध्ये विविध भाषांमध्ये उपलब्ध असलेले गाणी आणि संगीत उपलब्ध आहेत. टिप्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कुमार तौरानी म्हणाले, की भागीदारीमुळे क्रियटर आणि वापरकर्त्यांसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा-'पीएम केअर्स' फंडातले व्हेंटिलेटर कुठायत? काही निकामी, तर काहींसाठी तंत्रज्ञच नाही...
फेसबुकबरोबर टिप्सचा डिसेंबरमध्ये करार-