नवी दिल्ली- तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ हे अधिक आकर्षक पद्धतीने इडिट करण्याची आवड असेल तर तुम्हाला चांगला पर्याय मिळू शकतो. अमेरिकेची कॅमेरा उत्पादक गोप्रोने क्विक हे नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. हे अॅप ग्रोप्रोऐवजी अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध होणार आहे.
क्विक अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ हे फोन आणि कॅमेरामधून घेतले जाऊ शकतात. यामध्ये ग्रो प्रो आणि डीएसएलआरच्या कॅमेरातील फोटोचा समावेश आहे. अॅपमध्ये फोटो आणि व्हिडिओ इडिट करण्याचा पर्याय आहे. क्विक हे फोटो आणि व्हिडिओ फोनमधून अधिक गंमतीशीर करण्यासाठी साधा आणि चांगला पर्याय असल्याचे ग्रोप्रोचे संस्थापक आणि सीईओ निकोलस वूडमॅन यांनी म्हटले आहे. त्यासाठी क्विक अॅप तुम्हाला उघडण्याची गरज नाही. फोटो आणि व्हिडिओ हे जतन करणे सोपे आहे. खूप त्वरेने शक्य होत असल्याने अॅपचे नाव क्विक ठेवण्यात आल्याचे वूडमॅन यांनी सांगितले.
हेही वाचा-पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करण्यावर विचार करण्यास केंद्र सरकार तयार