नवी दिल्ली- फेसबुकने कोव्हिड १९ घोषणेचे (अनाउन्समेंट) टूल हे राज्यांचे आरोग्य विभाग आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी लाँच केले आहे. यापूर्वी हे टूल अमेरिकेमध्ये पहिल्यांदा लाँच केले होते.
कोव्हिड घोषणेच्या टूलसाठी फेसबुकने ३३ राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांबरोबर भागीदारी केली आहे. या टूलमुळे आरोग्य विभागांना वेळेवर आणि विश्वसनीय अशी कोव्हिड १९ आणि लसीकरणाची माहिती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. राज्यांनाही फेसबुकमधून ठराविक शहर अथवा राज्यांपुरते अलर्ट लोकांपर्यंत पाठविता येणार आहेत.
हेही वाचा-अॅमेझॉन इंडियाचे वेबसाईटसह अॅप दोन तास पडले बंद; ग्राहकांना त्रास
सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला मदत करण्यासाठी हे टूल देण्यात येत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. त्यामुळे आरोग्याच्या संकटात लोकांना वेळीच माहिती मिळेल व सुरक्षित राहू शकतील, असे फेसबुकने म्हटले आहे. जर राज्यांच्या आरोग्य विभागांनी त्यांच्या पेजवर कोव्हिड १९ घोषणा (अनाउन्समेंट) अशी पोस्ट केली तर ही पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कंपनीकडून त्या परिसरात राहणाऱ्यांना नोटिफिकेशन पाठविले जाणार आहे. तसेच कोव्हिड १९ माहिती केंद्र म्हणूनही फेसबुककडून राज्यांच्या घोषणा ठळक पद्धतीने दाखविल्या जाणार आहेत.
हेही वाचा-भेदभाव केल्याने पाच महिला कर्मचाऱ्यांकडून अॅमेझॉनविरोधात न्यायालयात खटला दाखल
काय होणार टूलचा फायदा?
- कोव्हिडसाठी संसाधने, हेल्पलाईन, रुग्णालयातील बेड आणि जिल्ह्यातील बेडची संख्या, आयसीयू बेड आणि ऑक्सिजन बेडची संख्या याविषयीची माहिती अनाउन्समेंट टूलमध्ये देता येणार आहे.
- कोरोना महामारीशी संदर्भात बदलेले नियमाची माहितीही देता येणार आहे. यामध्ये लॉकडाऊनचे नियम, रात्रीच्यावेळी संचारबंदी व कोरोना उपचारासाठी बदलेली पद्धत यांचा समावेश आहे.
- लोकांना लसीकरण नोंदणीसाठी जनजागृती, लशीबाबत अचूक माहिती, कोरोनाच्या काळात योग्य वागणूक आणि कोरोना टाळण्यासाठी आरोग्य उपाययोजना आदींचा समावेश आहे.