महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

इलॉन मस्क यांची फेसबुकवर टीका; 'सिग्नल' वापरण्याचा वापरकर्त्यांना सल्ला - Elon Musk latest news

इलॉन मस्क यांनी फेसबुकवरील एक मेम ट्विटर पोस्ट केले आहे. हॉवर्ड विद्यापीठात सुरू झालेल्या फेसबुककडून डोमिनोज एफेक्ट होत असल्याचे या मेममध्ये दाखविण्यात आले आहे.

इलॉन मस्क
इलॉन मस्क

By

Published : Jan 8, 2021, 4:07 PM IST

नवी दिल्ली-टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क यांनी ७ जानेवारीला ट्विट करत फेसबुकवर टीका केली आहे. अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झालेले व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाले होते. त्यारून मस्क यांनी फेसबुकवर टीका केली आहे.

इलॉन मस्क यांनी फेसबुकवरील एक मेम ट्विटर पोस्ट केले आहे. हॉवर्ड विद्यापीठात सुरू झालेल्या फेसबुककडून डोमिनोज एफेक्ट होत असल्याचे या मेममध्ये दाखविण्यात आले आहे. त्यामुळे कॅपिटॉल हिल या संसदेच्या इमारतीवर हल्ला होण्यासाठी फेसबुकची मदत झाल्याची मस्क यांनी टीका केली आहे.

हेही वाचा-टेस्ला इलेक्ट्रिक कार भारतामध्ये उपलब्ध नसल्याचे 'हे' आहे कारण, इलॉन मस्कने दिले उत्तर

मस्क यांच्याकडून सिग्नल वापरण्याचा सल्ला-

सिग्नलच्या वापरकर्त्यांची अचानक संख्या वाढली आहे. अनेक वापरकर्त्यांनी सिग्नलचा वापर करण्यास सुरुवात केल्याने त्यांना व्हेरिफेकेशन कोड लवकर मिळत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सिग्नलने ट्विटमध्ये म्हटले आहे. गतवर्षी व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण बदलले आहे. त्यावरूनही मस्क यांनी टीका केली होती. यांत्रिकी हात दाखवित त्यामध्ये अ‌ॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग दाखविण्यात आले होते. दरम्यान, टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क हे जगात सर्वाधिक श्रीमंत झाले आहेत. त्यांनी अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले आहे.

हेही वाचा-मेंदुतील चीप कॉम्प्युटरला जोडण्याची होणार चाचणी? मस्क यांच्या घोषणेकडे जगाचे लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details