सॅनफ्रान्सिस्को -गुगल क्रोमकडून सातत्याने वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर देण्यात येतात. अँड्राईडवर क्रोमचा वापर करणाऱ्यांसाठी खास फिचर सुरू करण्यात आले आहे. अँड्राईडवर क्रोम ९१ च्या वापरकर्त्यांना स्क्रीनशॉट टूल देण्यात आले आहे. त्यामधून ओम्नीबॉक्ससह सर्व फोटो कापणे, मजकूर टाकणे टाणे शक्य आहे.
मोबाईलमध्ये वापरकर्त्यांना इन बिल्ट स्क्रीनशॉटचे टूल मिळते. त्याप्रमाणे अँड्राईडवरून क्रोमचा वापर करतानाही स्क्रीनशॉटचे टूल हे वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना गुगलवरील वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढण्यासाठी मोबाईलचे टूल वापरता गुगल क्रोममधील टूल वापरता येणार आहे. गुगल क्रोममधील स्क्रीनशॉटच्या टूलमुळे वेबपेज शेअर करता येणार आहे.