नवी दिल्ली- अॅपलने रखडलेल्या पॉडकास्ट सबस्क्रीप्शन प्रोग्रॅम पुढील आठवड्यात लाँच करणार आहे. हे लाँचिंग जगभरात १५ जूनला होणार आहे.
क्रियएटर आणि श्रोते (लिस्टनर) यांना चांगला अनुभव मिळण्यासाठी पॉडकास्ट लाँच करणार असल्याचे यापूर्वी अॅपलने जाहीर केले होते. नवीन आयओएस १४.६ मध्ये ऑडिओ सुधारणा करण्यात आल्या आहेत. अॅपल म्युझिकच्या सबस्क्राईबरला लूजलेस ऑडिओ आणि डॉल्बी अॅटमोसचा आनंद घेता येणार आहे. अॅप पोडकास्ट सब्रस्क्रीप्शन आणि चॅनेल हे जूनमध्ये लाँच होणार आहेत. त्याबाबत अधिक माहिती देण्यासाठी संवाद साधणार आहोत.
हेही वाचा-कोरोना लशींसह औषधावरील जीएसटी दराबाबत १२ जूनला जीएसटी परिषदेची बैठक