महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

दिवाळीत गाडी खरेदच अनेकांचं स्वप्न अपूर्ण ,ई-बाइकला सहा महिने तर सीएनजी कारला वर्षाची वेटिंग

ग्राहकांची ई बाइकला (e-bikes) पसंदी आहे. मात्र, ई बाइकला सहा महिने तर सीएनजी कारला चक्क वर्षभराचे वेटिंग करावे लागत आहे. यामुळे दिवाळीत गाडी खरेदच अनेकांचं स्वप्न अपूर्ण राहील.

By

Published : Nov 14, 2021, 12:44 PM IST

pune news
ई-बाइक

पुणे - वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किमतीमुळे नागरिक ई बाइक (Electric Bike) आणि सीएनजी कारकडे वळले आहेत. मात्र वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे ई बाईकला तीन ते सहा महिने तर सीएनजी कार घेण्यासाठी सहा ते चौदा महिन्याचे वेटिंग ग्राहकांना करावे लागत आहे. यामुळे दिवाळीत गाडी खरेदच अनेकांचं स्वप्न अपूर्ण राहील.

यामुळे वेटिंग वाढलं

गेले दोन वर्ष कोरोनामुळे नवीन वस्तू खरेदी अथवा गाड्यांच्या खरेदीच्या प्लॅनिंग पुढे ढकलल्या ग्राहकांनी यंदाच्या दिवाळी पाडव्याला नवी गाडी खरेदी करण्याचे नियोजन केले असल्याचे पहायला मिळाले. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजाराचे गणित बिघडले आहे. लॉकडाऊनमुळे सारे जग ठप्प झाले होते. त्यात वाहन निर्मिती करणारे कारखाने बंद राहिले. कच्च्या मालाचा पुरवठा रखडला. यामुळे वाहन निर्मिती वर परिणाम झाला. लॉकडाऊनच्या काळात शो रूम बंद होते. तसेच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक लहान-मोठे व्यवसाय बंद पडले होते. त्यामुळे येत्या काळात वाहनांना मागणीबाबत साशंकता होतो. त्यामुळे वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी सावध पवित्रा घेतला. मात्र, आता मागण्यांची पूर्तता करण्याइतपत स्टॉक नाही. त्यामुळे वाहनांसाठी मोठे वेटिंग आहे.

कोरोनाचा प्रभाव

कोरोनापूर्वीच वाहन विक्री क्षेत्रात मंदीने पाऊल टाकले होते. वाहनांची विक्री होत नसल्याने 2019- 20 मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांवर मोठी सूट दिली होती. भविष्यात बीएस 6 इंजिनची वाहने येणार असल्याने त्यावेळी कंपन्यांना आपली वाहने विकायची होती. परंतु, त्यावेळी अपेक्षित मागणी नसल्याने वाहन विक्री क्षेत्रात मंदी आल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर करोनाचा कहर सुरू झाला. आता ही मंदी आणखी वाढेल, असे वाटत असतानाच मागणीत वाढू होऊ लागली. त्यामुळे वाहन बुक करून सहा ते चौदा महिने वाट पाहण्याची वेळ आली आहे.

सुट्या भागाचा तुटवडा

काही सुट्या भागांचे तुटवडा असल्याने उत्पादनावर परिणाम झाला आहे. विशेषतः चारचाकी वाहनांमध्ये गाडीच्या रेंजनुसार सेन्सर वापरण्यात येतात. काही वाहनांमध्ये 50, तर काही वाहनांमध्ये 400 सेन्सर वापरले जातात. सर्वच चारचाकी वाहनांमध्ये वापरले जाणारे हे सेन्सर बाहेरच्या देशातून येतात. तसेच इतरही काही सुट्या भागांचे सध्या शॉर्टज असल्याने वाहने बाजारात येण्यास उशीर होत आहे. असे वाहन विक्रेत्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details