पुणे- खेड येथील शिरोली परिसरात दोघांच्या हत्येप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या चिखली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत खेड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. गेल्या आठवड्यात खेडमधील शिरोली येथे अज्ञात दोन तरुणांची हत्याराने खून केला होता. त्यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी झाडा-झुडपात आढळला होता. दरम्यान, त्यातील दोन आरोपींना चिखली पोलिसांनी पकडले आहे.
मुख्य आरोपी सुरज प्रकाश रणदिवे (रा. नंदनवन होसिंग सोसायटी घरकुल, चिखली, पुणे) आणि किरण चंद्रकांत बेळामगी (रा. निलरत्न हौसिंग सोसायटी घरकुल, चिखली, पुणे) असे खेड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याचे एक पथक हवे असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. तेव्हा, खेड परिसरातील शिरोली येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि त्याचा साथीदार हे चिंचवड येथील बसस्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मुख्य आरोपी सूरज रणदिवे यासह किरण चंद्रकांत बेळामगी यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली.
खेड येथील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी जेरबंद; चिखली पोलिसांची कामगिरी - पिंपरी चिंचवड बातमी
खेड येथील शिरोली परिसार झालेल्या दुहेरी हत्याकांडातील आरोपींच्या चिखली पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चिखली पोलिसांनी पिंपरी-चिंचवड बसस्थानकाजवळून दोघांना ताब्यात घेत खेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
Breaking News
त्यानंतर चिखली पोलिसांनी या आरोपींना खेड पोलिसांच्या स्वाधीन केले. सदर ची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पोलीस कर्मचारी विश्वास नाणेकर, चेतन सावंत, विपुल होले, बाबा गर्जे, संतोष सपकाळ, कबीर पिंजारी, सचिन नलावडे यांच्या पथकाने केली आहे.