श्रीनगर - जम्मू - काश्मीरमध्ये लष्करी जवानांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीत जवानांनी २ दहशतवाद्यांचा खात्मा केला. ही चकमक पुलवामा जिल्ह्यातील राजपोरा येथे उडाली आहे. भारतीय जवानांनी या चकमकीत जैश - ए- मोहम्मदच्या शाहीद अहमद बाबा आणि इनियात अहमद जीगर या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले आहे.
जम्मू-काश्मीर : पुलवामामधील चकमकीत २ दहशतवादी ठार - चकमक
भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामा येथे चकमक उडाली आहे. या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खातमा केला आहे.
चकमक
पुलवामा सीमेवर भारतीय जवान गस्त घालत असताना या दोन दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यामुळे भारतीय जवानांनीही या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी शाहीद आणि इनियात या दोघांचा खातमा करण्यात जवानांना यश आले. त्यांच्याकडून एक एसएलआर बंदूक आणि पिस्तूल जप्त करण्यात आले.
गुरुवारीही जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील शेरबाग पोलीस ठाण्याजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात ३ नागरिकांसह सीआरपीएफचे २ जवान जखमी झाले होते.