गोंदिया - एकाने दोन मित्रांच्या मदतीने वडिलाचा खून करणाऱ्या मुलाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका बालकास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही घटना 1 ऑगस्टला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.
गोंदियात मुलाकडून वडिलांच्या खुन्याची हत्या; दोघे अटकेत, तर एकाची बालसुधारगृहात रवानगी - गोंदीया क्राईम बातमी
एकाने दोन मित्रांच्या मदतीने वडिलाचा खून करणाऱ्या मुलाची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एका बालकास बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
शहर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या शास्त्री वार्ड येथील पटेल चौकात जुन्या वादातून भांडण सुरू असताना एका तरुणाने मध्यस्थी करणाऱ्या वृद्धावर काठीने हल्ला करत त्याचा खून केला होता. आता मृताच्या मुलाने दगड व चाकूच्या सहाय्याने त्या तरुणाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. इम्रान रशीद खान (वय 20 वर्षे, रा. बादल किराणा जवळ शास्त्री वार्ड, गोंदिया), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी जयदीप लिल्लुलाल यादव (वय 24 वर्षे, रा शास्त्री वार्ड, गोंदीया), लक्की रामप्रसाद विश्वकर्मा (वय 22 वर्षे रा. पंचायत समिती कॉलनी, मजदूर भवन, गोंदिया) व एक बालक तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबात सविस्तर वृत्त असे, 11 जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास लिल्लूलाल समरसिंह यादव (वय 65 वर्षे, रा. शास्त्री वार्ड, गोंदिया) यांच्या मुलासोबत झालेल्या वादात ते मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी इम्रान रशीद खान याने काठीने त्यांना मारले यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात तो तुरुंगात होता. 31 जुलैला तो तुरुंगातून सुटून आला होता. आपल्या वडिलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जयदीप हा लक्की व एका 17 वर्षीय मुलाच्या मदतीने इम्रानचा चाकूने व दगडाने हल्ला करुन खून केला. याबाबत शैनाज रशीद खान (वय 40 वर्षे, रा. गरीब नवाज चौक, संजय नगर, गोंदिया) यांच्या तक्रीरीवरून तिघांविरोधात भा.दं.वि. 304, 34 सह कलम 4, 25 भारतीय हत्यार कायद्यन्वये गुन्हा दाखल केला. मात्र, त्यापैकी एक विधी संघर्षीत बालक असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले व दोघांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 4 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.