महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

खासगी कोविड सेंटरमध्ये महिलेचा मृत्यू; मुलाकडून डॉक्टरवर चाकूहल्ला - लातूर कोरोना बातमी

लातूर शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या मुलाने डॉक्टरावर चाकूने हल्ला केला. यात डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

latur private hospital
latur private hospital

By

Published : Jul 29, 2020, 1:39 PM IST

लातूर- शहरातील अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेल्या मुलानेच डॉक्टरावर चाकूहल्ला केला आहे. यामध्ये डॉ. दिनेश वर्मा हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उदगीर शहरातील 60 वर्षीय महिलेला धाप लागत असल्याच्या कारणाने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, परस्थिती खालावत असल्याने उदगीर येथील डॉक्टरांनी महिलेला लातूरच्या अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रेफर केले होते. मात्र, दोन दिवस उलटूनही डॉक्टर काही सांगत नव्हते. शिवाय कोणतेही उपचार न केल्यामुळे आईचा मृत्यू झाल्याचा आरोप करत मृत महिलेच्या मोठ्या मुलाने डॉक्टरवर चाकू हल्ला केला. यामध्ये डॉक्टर जखमी झाले आहेत. हल्लेखर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमी डॉक्टरावर उपचार सुरू आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेवरही अंत्यविधीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details