महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

सोलापूरमध्ये प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या - अल्पवयीन मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या

माढा तालुक्यातील अंजनगाव येथे प्रेम प्रकरणातून दहावीत शिकणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेम प्रकरणातून दहावीच्या मुलीची आत्महत्या

By

Published : Oct 3, 2019, 10:20 AM IST

सोलापूर -माढा तालुक्यातील अंजनगाव येथे इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीने केलेली आत्महत्या ही गावातील एका मुलाच्या त्रासाला कंटाळून केली असल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी केला आहे.

सोलापूरमध्ये माढा तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलीची आत्महत्या

माढा तालुक्यातील अंजनगाव (खेलोबा) गावातील एका वस्तीवर राहणाऱ्या दहावीतील मुलीने प्रेम प्रकरणातून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. या मुलीने केलेली आत्महत्या ही गावातील एका मुलाच्या त्रासाला कंटाळून केली असल्याचा आरोप मुलीच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी केला आहे. यामुळे मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुलीच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा... रिसोड शहरात चाकूने भोसकून युवकाची हत्या

2 ऑक्टोबर रोजी रात्री सायंकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली. घरात कोणालाही न सांगता ही मुलगी बेपत्ता झाली होती. आई-वडिलांनी व नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. यामुळे घरच्यांनी या प्रकरणाची खबर माढा पोलिसांना दिली. यानंतर तिचा शोध घेतला असता, बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तिचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळला.

हेही वाचा... पनवेलमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अग्निशामक अधिकाऱ्याची आत्महत्या​​​​​​​

आरोप करण्यात आलेला मुलगा आणि मुलीमध्ये चिठ्ठी व फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे यांनी तातडीने घटनास्थळी जात ग्रामस्थांच्या मदतीने मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. तसेच मुलीच्या वडिलांनी माढा पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी अंजनगावमधील दोन अल्पवयीन मुलांना या प्रकरणी ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details