हैद्राबाद- मानवी तस्करी प्रकरणी तंजानियाच्या एका महिलेला तेलंगणा पोलिसांनी हैद्राबादमधून अटक केली आहे. महिला हैद्राबादमध्ये वेशा व्यवसाय चालवत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी घटना स्थळावरुन दोन महिलांचीही सुटका केली आहे.
मानवी तस्करी प्रकरणी तंजानियाच्या महिलेला हैद्राबादमधून अटक - police
मानवी तस्करी प्रकरणी टांझानियाच्या एका महिलेला पोलिसांनी हैद्राबादमधून अटक केली आहे. महिला वेशा व्यवसाय चालवत असल्याचे उघड झाले आहे.
रामाधानी बायोनी असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला भारोनी कॉलनीत शेशा साई अपार्टमेंटमधून वेशा व्यवसाय चालवायची. महिलेला या कामात एडवर्ड नावाचा तिचा मित्र मदत करायचा. फोन किंवा मेसेज करुन महिला ग्राहकांसोबत संपर्क साधायची. ग्राहकांना मुली पुरवण्याचे काम ती या माध्यमातून करत होती.
यासंबंधी माहिती मिळाल्याने पोलिसांनी 19 जूलैला शेशा साई अपार्टमेंटवर छापा टाकला व महिलेला अटक केली. महिलेवर पीटा अंतर्गत (इमोरल ट्रफिक प्रिवेंशन अॅक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.