नांदेड - शहरात क्षुल्लक कारणावरुन चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
धक्कादायक! दारू पिण्यास पैसे न दिल्याने झेरॉक्स दुकानदारावर चाकू हल्ला - arrest
शहरात क्षुल्लक कारणावरुन चाकू हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. दारू पिण्यास पैसे न दिल्याने चाकू हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली आहे.
शहरातील श्रीनगर भागात भरदिवसा तक्रारदार विजयकुमार एकंडे हा रोशन चौधरी यांच्या सोबत झेरॉक्स काढण्यासाठी एका दुकानावर गेला होता. तेव्हा आरोपी सुभाष कांबळे (रा. जयभीमनगर नांदेड) व एका अनोळखी तरुणाने संगनमत करुन त्याच्याकडे दारु पिण्यास पैसे मागितले. विजयकुमार याने नकार देताच तू आम्हाला पैसे का देत नाहीस म्हणून आरोपी सुभाषने शिवीगाळ करीत चाकू हल्ला केला. यात विजयकुमारच्या कपाळ व डोक्यावर जबर दुखापत झाली आहे. तसेच आरोपींनी लाथाबुक्की करत विजयकुमारला जीवे मारण्याची धमकी दिली.
विजयकुमार एकंडे (रा. गोकुळनगर, नांदेड) याच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा २४०/२०१९ कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आर.एस.नरवाडे पुढील तपास करीत आहेत