महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

चिंताजनक : एकाच दिवशी विवाहिता बेपत्ता, तर दोन अल्पवयीन मुली गेल्या पळून - solapur police latest crime news

मंगळवेढा शहरातून २३ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पतीने पोलिसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता महिलेचा कसून शोध पोलीस घेत आहेत. यातील २३ वर्षीय बेपत्ता महिला सकाळी ६.०० च्या पूर्वी पतीच्या रामकृष्ण नगर येथील राहते घरातून कोणास काही न सांगता निघून गेली आहे.

one married women and two minor girl missing in mangalveda taluka at solapur district
one married women and two minor girl missing in mangalveda taluka at solapur district

By

Published : Aug 24, 2020, 2:18 PM IST

मंगळवेढा (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातून एक दिवशी तब्बल एक विवाहित महिला बेपत्ता, तर दोन अल्पवयीन मुली पळून गेल्याची घटना घडली. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यात अशा विचित्र घटना असल्याने खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा शहरातून २३ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाली असल्याची तक्रार तिच्या पतीने पोलिसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता महिलेचा कसून शोध घेत आहेत. यातील २३ वर्षीय बेपत्ता महिला सकाळी ६.०० च्या पूर्वी पतीच्या रामकृष्ण नगर येथील राहते घरातून कोणास काही न सांगता निघून गेली आहे.

तालुक्यातील भालेवाडी येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सायंकाळी ६.०० च्या दरम्यान घरातून लघुशंकेला जाते असे सांगून ती राहते घरातून बाहेर पडली. तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेले असल्याची तिच्या वडिलांनी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरूध्द तक्रार दाखल केली आहे.

तिसरी घटना तालुक्यातील सलगर येथून एका १६ वर्षीय मुलीला अमिष दाखवून पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलगर येथून दुपारी १२.०० च्या दरम्यान राहते घरातून १६ वर्षीय मुलगी बाहेर पडली ती रात्री उशिरापर्यंत घरी परतली नाही. अल्पवयीन असल्याने तिला कोणीतरी आमिष दाखवून पळवून नेले असल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांत दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवेढा तालुक्यात बेपत्ता व पळून जाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे नागरिकामधून चिंता व्यक्त केली जातात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details