महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

#JusticeForNimrita : पाकिस्तानात हिंदू तरुणीची हत्या; धर्मांतरासाठी बळजबरी केल्याचा संशय - pakistan forced conversion

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पाकिस्तानी तरुणीचा मृतदेह तिच्याच हॉस्टेलमध्ये आढळून आला होता. पोलीस आणि प्रशासनाच्या मते ही आत्महत्या होती. मात्र, धर्मांतरासाठी बळजबरी करत तिचा खून झाला असल्याचा देखील संशय व्यक्त केला जातो आहे.

#JusticeForNimrita

By

Published : Sep 17, 2019, 8:41 PM IST

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात, प्रथम वर्षीय वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी, पोलीस आणि प्रशासनाने ही आत्महत्या असल्याचे म्हणले आहे. मात्र, मुलीचा भाऊ आणि इतर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मते, हा खून आहे. दरम्यान, खूनापूर्वी तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही व्यक्त केला जातो आहे.

निम्रिता चंदानी ही वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षाला होती. मूळची पाकिस्तानातील घोतकी गावात राहणारी निम्रिता ही हिंदू होती. तिच्या गावात नुकतीच एका मंदिराची तोडफोड करण्यात आली होती.

निम्रिता ज्या खोलीत राहत होती, त्या खोलीत तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्याभोवती तिची ओढणी बांधलेली होती. मात्र, हा केवळ बनाव असल्याचे तिच्या भावाने म्हटले आहे. निम्रिताचा भाऊ विशाल हादेखील वैद्यकीय शिक्षण घेतो आहे. प्राथमिक तपासणीमध्ये तिच्या गळ्याभोवती तारेचे व्रण असल्याचे दिसून आले, मात्र तिच्या गळ्यात तिची ओढणी बांधलेली होती. त्यामुळे नक्कीच ही आत्महत्या नाही तर हा खून असल्याचे विशालचे म्हणणे आहे. आत्महत्या करण्यासाठी तिच्याकडे काही कारणही नव्हते. ती कोणत्याही तणावात नव्हती असेही त्याने स्पष्ट केले.

हेही वाचा : काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्राला विनंती

धर्मांतरासाठी बळजबरी केल्याचा संशय..

मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानातील हिंदूंचे बळजबरी धर्मांतर केल्या गेल्याच्या बऱ्याच घटना उघडकीस आल्या आहेत. पाकिस्तानच्याच मानव अधिकार संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, २००४ ते २०१८ दरम्यान जवळपास ७,४३० मुलींचे बळजबरी धर्मांतर केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातही अशा प्रकारची जबरदस्ती केली गेली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलेच उचलून धरले जात आहे. पाकिस्तानसह भारतीय नेटीझन्सही निम्रिताला न्याय मिळावा यासाठी #JusticeForNimrita या हॅशटॅगखाली आपले मत मांडत आहेत.

हेही वाचा : भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हरू शकतो - इम्रान खान

ABOUT THE AUTHOR

...view details