भोपाळ -मध्य प्रदेशातील राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत, 'हनीट्रॅप'मध्ये गुंतवल्याच्या आरोपाखाली पाच महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली होती. या अटकेच्या काही दिवसानंतर, आज आरोपींपैकी एकीने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामधील आरोपींपैकी एकीने, २ वर्षांपूर्वी भोपाळमध्ये या सत्राची सुरुवात केल्याची कबूली दिली. हनीट्रॅप प्रकरणात एक संपूर्ण टोळी कार्यरत असल्याचा खुलासादेखील तिने केला. दरम्यान, या आरोपीच्या कुटुंबीयांनी असे म्हटले आहे, की अभ्यासाच्या बहाण्याने जबरदस्ती तिला या जाळ्यात ओढले गेले होते.